Avoid These things After Eating A Meal: जेवणानंतरच्या या चुकीच्या सवयी ठरु शकतात आरोग्यास घातक, आजच करा आहारात बदल

Health Tips : खाण्यापिण्याच्या किंवा झोपण्याच्या सवयींमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत.
Avoid These things After Eating A Meal
Avoid These things After Eating A Meal Saam tv
Published On

Common Mistake After Eating Meal : व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीत बदल झाला आहे. कामाचा वाढता ताण, बदलेली जीवनशैली आणि झोपेच्या वेळांमुळे अनेकांची जीवनशैली बदलत चालली आहे. खाण्यापिण्याच्या किंवा झोपण्याच्या सवयींमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत.

दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर, लोक बरेचदा जेवल्यानंतर झोपी जातात. मात्र रात्रीच्या जेवणानंतर सरळ झोपणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. फक्त झोपणेच नाही तर रात्रीच्या जेवणानंतरच्या अनेक सवयी तुम्हाला आजारी बनवू शकतात. जर तुम्हीही यापैकी कोणत्याही सवयीचे बळी असाल तर वेळीच ती बदला.

Avoid These things After Eating A Meal
Best Way To Morning Walk : मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता करावा की नाही? वॉकची योग्य पद्धत कोणती, जाणून घ्या

1. रात्रीचे जेवण उशिरा

अनेकदा काम (Work) संपवून लोक खूप थकतात. अशा स्थितीत अनेकदा लोक रात्रीचे जेवण उशिरा करतात. रात्री उशिरा खाणे ही सर्वात वाईट सवय आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि उशिरा जेवण केल्याने शरीरातील विविध हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते. तसेच, तुमचा चयापचय देखील मंदावू शकतो, ज्यामुळे तुम्ही लठ्ठपणाचे (Overweight) शिकार होऊ शकता.

Avoid These things After Eating A Meal
Drinking Hot Water Morning Benefits: रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे माहितेय का?

2. खाल्ल्यानंतर लगेच झोपणे

अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. तुमच्या या स्थितीचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्न पचण्यासाठी आवश्यक एन्झाइम्स बाहेर पडत नाहीत, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जेवल्यानंतर लगेच झोपण्याची (Sleep) सवय बदलली तर बरे होईल. रात्रीचे जेवण घेतल्यानंतर सुमारे एक तास झोपू न जाण्याचा प्रयत्न करा.

3. जेवल्यानंतर फोन वापरणे

आजकाल मोबाईल, लॅपटॉप इत्यादी आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. अशा परिस्थितीत, लोक बहुतेकदा त्यांचा जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर घालवतात, परंतु जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल, जे जेवल्यानंतर लगेच स्क्रीनवर आपली नजर ठेवतात, तर काळजी घ्या. झोपताना स्क्रीनचा वापर केल्याने झोपेमध्ये अडथळा येतो. यामुळे कॉर्टिसोल हार्मोन बाहेर पडतो, ज्यामुळे तणाव आणि नैराश्याची समस्या वाढू शकते . यासोबतच झोपेचे चक्रही बिघडते.

Avoid These things After Eating A Meal
Smallest Hill Station Near Mumbai : मुंबईजवळचं नयनरम्य, पण सगळ्यात छोटं हिल स्टेशन, घरी यावंसंच वाटणार नाही!

4. सिगारेट ओढणे

सिगारेट आणि अल्कोहोल प्रत्येक प्रकारे आरोग्यास हानी पोहोचवते, परंतु जर तुम्ही ते खाल्ल्यानंतर पित असाल तर ही सवय बदला. असे केल्याने तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. रात्रीच्या जेवणानंतर सिगारेट-दारू प्यायल्याने पोटात ऍसिड रिफ्लेक्स, हार्ट बर्न, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर असे दीर्घकाळ केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

5. खाल्ल्यानंतर चालण्याची सवय

जेवल्यानंतर काही वेळ चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु असे करण्याऐवजी तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपायला गेलात तर ते चुकीचे आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतर दररोज सुमारे 10 मिनिटे चालण्याची सवय लावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com