कोमल दामुद्रे
आपल्याला प्रवासाचे अनेक पर्याय मिळतील पण जर शांत व सुंदर ठिकाण शोधत असाल तर भारतातील हे लहान हिल सगळ्यात भारी व लोकप्रिय आहे.
महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. आर्थिक राजधानी मुंबईबाहेरील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर, नाशिक येथे लोक जाऊ शकतात.
या ठिकाणाचे नाव माथेरान हिल स्टेशन आहे, जिथे सुट्टया संस्मरणीय बनवता येतात.
माथेरान हे हिल स्टेशन महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे.
मुंबईपासून ९२ किमी आणि पुण्यापासून १२१ किमी अंतरावर असलेल्या या हिल स्टेशनला रस्ते आणि रेल्वेने पोहोचू शकतात.
प्रवासाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी, नेरळ ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या टॉय ट्रेनचा पर्याय निवडता येईल.
पुण्याहून माथेरानला जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग घेणे अधिक योग्य ठरेल.
माथेरान हिल स्टेशनला जाण्यासाठी नेरळ येथून दोन फूट रुंद नॅरो गेज मार्गावर टॉय ट्रेन सुरू होते, हा सर्वोत्तम पर्याय आहे.
टॉय ट्रेन पर्यटकांना माथेरानच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जाते.