Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी विशेष! वाहन-प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम योग, शुभ मुहूर्त पाहा

Ganesh Chaturthi 2023 Tithi : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Saam Tv

Ganesh Chaturthi Shubh Muhurt :

१९ सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. या १० दिवसाच्या काळात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या १० दिवसात जर तुम्ही सुद्धा गणपतीची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील. जाणून घेऊया शुभ योग, तिथी आणि खरेदीचा मुहूर्त

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 Puja List : गणेश पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? पाहा लिस्ट

1. गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी सोने (Gold), चांदी, कार जमीन यासारख्या शुभ वस्तूंची खरेदी फायदेशीर ठरते. यावर्षी गणपतीला ३०० वर्षांनी शुभ संयोग तयार झाला आहे. त्यामुळे लक्ष्मी देवीचा आशिर्वाद मिळेल. तसेच या दिवशी स्वाती आणि विशाखा नक्षत्र, रवियोगाचा योगायोग आहे.

2. गणेश उत्सवात खरेदीचा शुभ मुहूर्त कधी?

१९ सप्टेंबर २०२३ रोजी येणारी गणेश चतुर्थी अनेक अर्थांनी खास आहे. १९ ते २९ सप्टेंबर दरम्यान गणपतीची पूजा करुन नवीन व्यवसाय सुरु करु शकता. तसेच घर (Home) किंवा वाहन देखील खरेदी करु शकता. त्यासोबतच मालामत्ता खरेदी किंवा फ्लॅट बुक करु शकता.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाला नैवेद्यात दाखवा हेल्दी अन् चविष्ट शेंगदाण्याचे मोदक, पाहा रेसिपी

3. गणेश उत्सव २०२३ वाहन खरेदीचा मुहूर्त

  • 20 सप्टेंबर 2023-2.59 PM - 6.09 AM,

  • 21 सप्टेंबर 2023-सकाळी 6.09 - 2.14

  • 25 सप्टेंबर 2023-11.55 AM - 05.00 AM,

  • 27 सप्टेंबर 2023-सकाळी 6.12 ते रात्री 10.18

4. गणेश उत्सव २०२३ मालमत्ता खरेदीचा मुहूर्त

  • 21 सप्टेंबर 2023-06:09 AM- 3.35 PM

  • 22 सप्टेंबर 2023-03.34 PM - 06.10 AM

  • 28 सप्टेंबर 2023-06:12 AM- 01.48 AM

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Ganesh Chaturthi 2023
White Hair Problem : खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळून लावा, पांढरे केस होतील काळेभोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com