White Hair Problem : खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळून लावा, पांढरे केस होतील काळेभोर

कोमल दामुद्रे

तरूणपणातच होतात पांढरे केस

सध्याची लाइफस्टाइल, वाढतं प्रदूषण आणि केमिकलयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे तरुणपणातच केस पांढरे होऊ लागतात.

घरगुती उपाय

अशावेळी घरगुती उपाय करून ही समस्या दूर करू शकता.

खोबरेल तेल आणि कढीपत्ता

खोबरेल तेल आणि कढीपत्त्यात असलेल्या पोषक घटकांमुळं केस मजबूत होतात. त्यांचे मिश्रण करून लेप केसांवर लावल्यास पांढरे केस काळेभोर होऊ शकतात.

मिश्रण कसं तयार कराल?

साधारण १५ पानं कढीपत्त्याची घ्या. खोबरेल तेलात टाका आणि गरम करून घ्या. तासभर ते थंड होऊ द्या.

मिश्रण केसांवर लावा

कढीपत्त्याचं मिश्रण असलेलं तेल केसांच्या मुळांपर्यंत लावा. साधारण ४५ मिनिटांपासून २ तासांपर्यंत ते धुवू नका.

शॅम्पूने केस धुवा

केसांवर माइल्ड शॅम्पू लावून धुवून काढा. आठवड्यातून दोन वेळा हे मिश्रण केसांवर लावा.

खोबरेल तेल आणि लिंबाचा रस

लिंबात अॅण्टी ऑक्सिडेट्स असतात. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांवर लावल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात.

असे तयार करा तेल

४ चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात ४ चमचे लिंबाचा रस मिसळा. केसांच्या मुळांपर्यंत ते मिश्रण लावा.

४५ मिनिटे केस धुवू नका

मिश्रण केसांवर लावल्यानंतर ४५ मिनिटे धुवू नका. नंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून दोनदा हे मिश्रण लावू शकता. हे उपाय करण्याआधी तज्ज्ञांकडून सल्ला घ्या.

Next : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?