Ganesh Chaturthi 2023 Puja List : गणेश पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? पाहा लिस्ट

Ganesh Chaturthi 2023 Tithi : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Ganesh Chaturthi 2023 Puja List
Ganesh Chaturthi 2023 Puja ListSaam Tv
Published On

Ganesh Puja List :

सगळ्यात आवडता आणि महाराष्ट्रात मोठ्या धूमधड्याक्यात साजरा केला जाणारा सण गणेशोत्सव. लवकरच घरोघरी बाप्पाच्या मूर्तीचे आगमन होणार आहे. यंदा बाप्पाचे आगमन हे १९ सप्टेंबरला आहे.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरगुती गणेशोत्सव हा किमान दीड, अडीच, पाच, सात आणि १० दिवसांचा असतो. या दरम्यान परंपरेने आपण श्रीगणेशाची पूजा करतो. घरी गणपती आल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठेने स्थापना देखील करतो. परंतु, ऐनवेळी पूजा करताना साहित्य नसल्यामुळे आपला गोंधळ उडतो. अशावेळी तुमचीही गडबड होऊ नये यासाठी पूजेला लागणारे साहित्य कोणते याची लिस्ट पाहा.

Ganesh Chaturthi 2023 Puja List
Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला अद्भूत योग! या राशी होतील मालामाल

1. श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त

१८ सप्टेंबर २०२३ला १२ वाजून ३९ मिनिटांनी भाद्रपद महिन्यातील चतुर्थी (Chaturthi) असून १९ सप्टेंबर २०२३ ला १ वाजून ४४ मिनिटांना संपेल. यंदा ही चतुर्थी मंगळवारी आल्याने शुभ योग तयार झाला आहे.

2. श्रीगणेशाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य -

हळदी-कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड, कापसाची वात, कापसाची वस्त्रे, हार, आंब्याचे डहाळे, पंचामृत, समई, दिवा, वात, मिश्र फळे, प्रसाद, मिठाई आदी

Ganesh Chaturthi 2023 Puja List
Ganesh Chaturthi 2023 : श्रीगणेशाला मोदक अतिप्रिय का? जाणून घ्या कारण

गणेश चतुर्थीपासून ते पुढील १० दिवस श्रीगणेशाची मनोभावे पूजा- अर्चना केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. या काळात गणपतीच्या पूजेमध्ये काही खास गोष्टींचा समावेश केला जातो. या गोष्टींशिवाय गणपतीची (Ganpati) पूजा अपूर्ण मानली जाते.

Ganesh Chaturthi 2023 Puja List
Jyeshtha Gauri Pujan 2023: तयारी झाली का? १९ सप्टेंबरला गणराया येणार घरोघरी, ज्येष्ठागौरी पूजन कधी? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com