Jyeshtha Gauri Pujan 2023: तयारी झाली का? १९ सप्टेंबरला गणराया येणार घरोघरी, ज्येष्ठागौरी पूजन कधी? जाणून घ्या

Ganpati Bappa Morya : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Saam tv

Ganesh Chatutrthi Tithi :

आला आला आला माझा गणराया आला... घरोघरी गणपती बाप्पा लवकरच विराजमान होणार आहे. सफासफाईपासून ते इतर अनेक गोष्टींची तयार सुरु आहे. यंदा गणेशोत्सव हा १९ सप्टेंबरपासून सुरु होतोय.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसात बाप्पा आपल्याला घराघरात पाहायला मिळतील. हा उत्सव अवघ्या १० दिवसांचा असतो. यांची सुरुवात पूजनाने होते व सांगता विसर्जनाने होते.

Ganesh Chaturthi 2023
South Bombay Famous Place : दक्षिण मुंबईतील झक्कास ठिकाणं...,खाणं-फिरणं सगळं एकाच दिवसात होईल!

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) हा गणपती बाप्पाचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवसांपासून ते अनंत चतुर्दशी हा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळतो. कुठे दीड दिवसाचा, अडीच दिवसाचा, पाच-सात ते १० किंवा २१ दिवस बाप्पा हा विराजमान असतो. जाणून घेऊया तिथी आणि शुभ मुहूर्त

1. ज्येष्ठागौरी आवाहन कधी?

यंदा मंगळवारी १९ सप्टेंबर २०२३ ला गणपती बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन होणार आहे. त्याच्या अदल्यादिवशी हरतालिका व्रत असेल तर दुसऱ्या दिवशी अर्थात २० सप्टेंबरला ऋषिपंचमी साजरी केली जाईल. २१ सप्टेंबरला ज्येष्ठगौरी आवाहन आणि बलराम जयंती आहे. तर २२ सप्टेंबरला ज्येष्ठागौरी पूजन आहे आणि २३ सप्टेंबरला ज्येष्ठागौरी विसर्जन केले जाईल. अर्थात पाच दिवसांचे गणपतींची या दिवशी सांगता होईल.

Ganesh Chaturthi 2023
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

2. श्री गणेश तिथी आणि शुभ मुहूर्त

१८ सप्टेंबर २०२३ ला १२ वाजून ३९ मिनिटांना भाद्रपद महिन्यातील चतुर्थी सुरु होईल तर १९ सप्टेंबर २०२३ ला १ वाजून ४४ मिनिटांनी संपेल. यंदा ही चतुर्थी मंगळवारी आल्याने महा-चतुर्थी समजली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com