South Bombay Famous Place : दक्षिण मुंबईतील झक्कास ठिकाणं...,खाणं-फिरणं सगळं एकाच दिवसात होईल!

कोमल दामुद्रे

मुंबई

मुंबईला स्वप्नांचं शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईत असे अनेक ठिकाणं आहेत जे खाण्याफिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती.

एलिफंटा लेणी

१९८७ मध्ये, एलिफंटा लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस, बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

समुद्रकिनारे

सात बेटांवर वसलेल्या मुंबईला समुद्र किनारा देखील लाभला आहे. मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, बॅण्डस्टॅण्ड या ठिकणी नेहमी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

हाजी अली

वरळी भागात वसलेल्या हाजी अली दर्गा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मक्का येथे यात्रेस जाताना आपले प्राण गमाविणा-या मुस्लिम संतांच्या स्मरणार्थ ही मशिद उभारण्यात आली आहे.

कमला नेहरु उद्यान

कमला नेहरू पार्क हे मुंबई, महाराष्ट्र, भारतातील हँगिंग गार्डन कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे.

महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी परिसरातील भुलाभाई देसाई मार्गावरील मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक महालक्ष्मी मंदिर आहे.

क्रॉफर्ड मार्केट

शॉपिंग करणाऱ्यांसाठी पर्वणी म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. दक्षिण मुंबईत शॉपिंगसाठी हा भाग प्रसिद्ध आहे.

Next : बजेटमध्ये फिरा शिर्डी; वन डे ट्रिप कशी कराल? जाणून घ्या सविस्तर