Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाला नैवेद्यात दाखवा हेल्दी अन् चविष्ट शेंगदाण्याचे मोदक, पाहा रेसिपी

How To Make Peanut Modak : नवीन पद्धतीने मोदक ट्राय करण्याचा प्रयत्न करत असाल, तर शेंगदाण्यापासून बनवा हेल्दी आणि चविष्ट मोदक
Peanut Modak
Peanut ModakSaam Tv
Published On

Peanut Modak Recipe :

महाराष्ट्रात गणपतीचे आगमन मोठ्या थाटामाटात साजरा केले जाते. अवघ्या काही दिवसातच बाप्पाचे घरोघरी आगमन होईल. यंदा बाप्पा १९ सप्टेंबरला मंडळात आणि घरी विराजमान होणार आहे.

या १० दिवसात गणपतीला लाडू आणि मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. जर तुम्ही देखील नवीन पद्धतीने मोदक ट्राय करण्याचा प्रयत्न करत असाल, तर शेंगदाण्यापासून बनवा हेल्दी आणि चविष्ट मोदक. पाहूया रेसिपी

Peanut Modak
Guava Chutney Recipe : कच्च्या पेरुपासून बनवा आंबट-गोड चटणी, एकदा खाल तर म्हणाल वाह!

1. साहित्य

  • शेंगदाण्याचे पीठ - 1 कप

  • पाणी (Water) - दीड कप

  • तूप - २ चमचे

  • किसलेला नारळ (Coconut) - 1 कप

  • गूळ - १ कप

  • वेलची पावडर- 1 टीस्पून

  • गुलाब पाणी - 1 टीस्पून

2. कृती

  • सर्व प्रथम, एका भांड्यात शेंगदाण्याचे पीठ चाळून घ्या आणि नंतर त्यात बेकिंग सोडा, वेलची पावडर आणि गुलाब पाणी घालून चांगले मिसळा.

  • नंतर खोबरे किसून घ्या. गॅसवर पॅन ठेवून त्यात तूप घालून मंद आचेवर खोबरे परतून घ्या.

  • नारळाचा वास यायला लागल्यावर एका भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवा. आता पुन्हा कढईत तूप, वेलची आणि गूळ घालून घट्ट होईपर्यंत शिजवा.

Peanut Modak
Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला अद्भूत योग! या राशी होतील मालामाल
  • आता गॅस बंद करा आणि खोबरे घालून भरणे तयार करा. नंतर मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.

  • आता दुसऱ्या पॅनमध्ये पाणी, तूप आणि मीठ घाला. आता गॅसवर ठेवा आणि उकळू द्या.

  • मंद आचेवर हळूहळू शेंगदाण्याचे पीठ घाला. आता पटकन पीठ पाण्यात मिसळा. पीठ पाण्यात मिसळेपर्यंत चमच्याने ढवळत राहा.

  • गॅस बंद करा आणि स्टोव्ह वरून पॅन काढा आणि नंतर 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून पॅन झाकून ठेवा.

  • आता एका मोठ्या थाळीत सर्व पीठ काढून मोदकाचे पीठ मळून घ्या.

  • यानंतर, पिठाचे छोटे गोळे बनवा आणि ते गुळगुळीत होईपर्यंत तळहातावर फिरवा. हे गोळे किचन टॉवेलने झाकून बाजूला ठेवा.

  • आता एक बॉल घ्या आणि त्याला तुमच्या बोटांनी गोल आकार द्या. फिलिंग मध्यभागी ठेवा आणि फिलिंग दाबा. आता स्टीमर पॅनच्या साहाय्याने १०-१५ मिनिटे मोदक (modak) वाफवून घ्या. 

Peanut Modak
Ganesh Chaturthi 2023 Puja List : गणेश पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? पाहा लिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com