ताटच्या डाव्या बाजूला वाढला जाणारा पदार्थ म्हणजे चटणी किंवा कोशिंबीर. जेवताना तोंडी लावता येणारा आंबट-गोड पदार्थ म्हणून चटणीला ओळखले जाते. चटपटीत चटणी म्हटलं की, आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही.
भजी, वडे, चाट किंवा इतर तळणीच्या पदार्थांसोबत चटणीही ताटात वाढली जाते. सध्या पावसाळा ऋतू सुरु असल्यामुळे आपल्याला चमचमीत, मसालेदार आणि आंबट-गोड पदार्थ खावेसे वाटतात. चटणी हा भारतीय जेवणाताला महत्त्वाचा पदार्थ आहे. अनेकदा बाजारात आपल्याला पेरु पाहयाला मिळतात.
पाहाताच क्षणी आपल्याला तोंडाला पाणी सुटते. अशावेळी आपण घरी आणतो. परंतु, बरेचदा घरी आणलेले पेरु हे कच्चे असतात. त्यावेळी नेमके काय करायचे हे आपल्याला समजत नाही. पण आज आम्ही तुम्हाला पेरुची मसालेदार आंबट गोड चटणी (Chutney) सांगणार आहोत. पाहूया रेसिपी.
2. कृती
पहिल्यांदा पेरु धुवून स्वच्छ करा. त्याचे तुकडे करुन चांगले भाजून घ्या.
भाजलेल्या पेरुला बाऊलमध्ये घेऊन त्यावर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे ठेवा.
त्यानंतर पेरुची साल काढून घ्या. नंतर पेरुला मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात पुदिना, आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, काळ मीठ, लिंबाचा रस, पाणी, जिरे घाला.
मिश्रणात गरजेनुसार पाणी घाला आणि पुन्हा बारीक करा.
तयार पेरुची चटणी गाळून घ्या. आता चटणी एअर टाईट बरणीत ठेवा. तयार आहे. गोड आणि आंबट पेरूची चटणी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.