Shravani Somvar 2023 : पाचवा श्रावणी सोमवार; नागपंचमी शुभ संयोग, या शिवभक्तांना मिळणार दुहेरी लाभ

Shravani Somvar 2023 Puja : श्रावण महिना हा अधिक पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते.
Shravani Somvar 2023
Shravani Somvar 2023Saam Tv
Published On

Nag Panchami 2023 : श्रावणी सोमवारीचा उद्या पाचवा सोमवारी. निज श्रावण सुरु झाला असून हा महिना शंकराला अतिशय प्रिय आहे. २१ ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे. त्यामुळे शुभ संयोग तयार झाला आहे.

या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा केल्याने तुम्हाला दुहेरी लाभ मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार पाचवी श्रावणी सोमवारी विशेष संयोग तयार होत आहे. श्रावण महिना हा अधिक पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. सोमवारी चंद्र तूळ राशीत असणार आहे. यावेळी चंद्र आणि गुरु समोरासमोर असतील. त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे.

Shravani Somvar 2023
Nag Panchami 2023 Date: नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व पूजा पद्धत

यादिवशी पहाटे ४.२२ वाजता सर्वार्थ सिद्धी योग असेल. अमृत योगही तयार होत आहे. सर्व शुभ योगासोबत रवि योगही राहणार आहे. 21 ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे. त्यामुळे या दिवशी कालसर्प दोष (Kaal Sarp Dosh) आणि पितृदोष (Pitrudosh) निवारणासाठी काळ अतिशय चांगला जाणार आहे. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणेही उत्तम. तसेच या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक करणे देखील खूप फलदायी ठरेल.

1. पंचमी तिथीचा शुभ काळ आणि महत्त्व

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी २१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १२.२३ ते २२ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत राहील. मान्यतेनुसार नागपंचमीच्या (Nag Panchami) दिवशी नागांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने जीवनातील समस्या नष्ट होतात. तसेच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Shravani Somvar 2023
Nag Panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी चपाती का बनवली जात नाही? जाणून घ्या कारणं

2. नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी अर्पण करा

कालसर्प दोष टाळण्यासाठी या दिवशी भगवान शंकराला कच्चे दूध, काळे तीळ, तांदूळ आणि गंगाजल अर्पण करा. या उपायाने तुमचा कालसर्प दोष आणि पितृदोषाचा त्रास कमी होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com