कोमल दामुद्रे
चपातीशिवाय आपल्या ताटातील अन्न हे अपूर्ण असते.
परंतु, काही विशिष्ट सणाला चपाती खाणे वर्ज्य मानले जाते.
असे म्हटले जाते की, नागपंचमीला चपाती खाऊ नये यामागचे नेमके कारण काय जाणून घेऊया
या सणानिमित्त काही खास नियम आहेत ज्याचे आपण पालन प्रत्येकांने केले पाहिजे.
21 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी चिरणे, तळणे व भाजणे यांसारख्या गोष्टी करु नये असे म्हटले जाते. असे का हे जाणून घेऊया.
चपाती बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो.
लोखंडी जाळी ही सापाच्या फणीची प्रत मानली जाते. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी तवा अग्नीवर ठेवला जात नाही.