Fathers Day 2024: वडिलांवर असलेले प्रेम व्यक्त करता येत नाहीये? यंदाच्या फादर्स डेला वडिलांसोबत या गोष्टी नक्की करा

Celebrate Fathers Day With Family: दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डेनिमित्त तुम्ही तुमच्या वडिलांना खास सरप्राईज देऊ शकता.
Fathers Day 2024
Fathers Day 2024Saam Tv
Published On

प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती आई- वडील असतात. आई वडील नेहमीच आपल्या मुलांसाठी काही न काही करत असतात. त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र काम करत असतात. आईची माया मुलांना दिसते, परंतु वडिलांचे कष्ट, मेहनत कदाचित दिसत नसते. परंतु आपले बाबा नेहमी आपल्यावर खूप प्रेम करत असतात. आपल्यावर खूप माया करतात, वेळप्रसंगी कठोर होतात. रोजच्या जीवनात आयुष्य कसं जगायचं याचे धडे देतात. याच वडिलांचा सन्मान करण्यासाठी १६ जूनला फादर्स डे साजरा केला जातो.

फादर्स डे हा प्रत्येक वडिलांना समर्पित केलेला दिवस असतो. मुले आणि बाबादेखील आपले त्यांच्यावर असलेले प्रेम दाखवत नाही. परंतु त्यांच्या मनात एकमेकांबद्दल खूप प्रेम असते. मुली आणि वडिलांचे नाते खूप वेगळे असते. मुली आपल्या वडिलांवर असलेले प्रेम नेहमी व्यक्त करतात. परंतु मुलं जास्त बोलत नाही. परंतु फादर्स डेनिमित्त तुम्ही तुमच्या कृतीतून प्रेम व्यक्त करु शकतात. आपल्या वडिलांना खूश करु शकतात. आम्ही तुम्हाला आज अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्ही तुमच्या वडिलांसोबत केल्यावर त्यांना खूप आनंद होईल.

चित्रपट

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यात वडिल आणि मुलांचे नाते दाखवले आहे. वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या बाबांना हे चित्रपट नक्की दाखवा. यामुळे तुमचे त्यांच्यासोबत असलेले नाते आणखी घट्ट होईल. बॉलिवूडमधील जुने चित्रपट पाहिल्याने तुमच्या वडिलांनीदेखील खूप आनंद होईल.

डिनर

तुम्ही तुमच्या वडिलांसाठी खास डिनर प्लान करु शकतात. नेहमी वडिल आपल्याला बाहेर जेवायला घेऊन जातात. परंतु स्वतः साठी काही खर्च करायला सांगितल्यावर करत नाही. म्हणून फादर्स डेनिमित्त तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत बाहेर जेवायला जा. तिथे वडिलांसाठी खास सरप्राईज प्लान करा. हॉटेलमध्ये वडिलांसाठी खास केक कापा आणि एन्जॉय करा.

Fathers Day 2024
Yoga For Good Sleep : डोळे मिटले तरी रात्रभर झोप लागत नाही? मग आजपासूनच 'ही' योगासने ट्राय करा

वन डे ट्रीप

फादर्स डे हा जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही वीकेंडला फिरायला जाऊ शकतात. तुमच्या शहराच्याजवळ एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा रिसॉर्टला जाऊ शकता. तिथे तुम्ही तुमच्या वडिलांसोबत वेळ घालवू शकतात. यामुळे तुमच्या नात्यात अजूनच गोडवा निर्माण होईल.

Fathers Day 2024
Relation Tips: जोडीदाराशी पहिल्या भेटीत काय बोलावं कळत नाही; तर या टिप्स करा फॉलो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com