Tupperware Tiffin Box: चिमुकल्यांचा लाडका टपरवेअरचा टिफन बॉक्स होणार लवकरच गायब...

Equipment in kitchen : लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सगळ्याचा आवडता असा टपरवेअरचा टिफिन हा आता दिसेनासा होणार आहे.
Tupperware Tiffin Box
Tupperware Tiffin BoxSaam Tv
Published On: 

Tupperware Tiffin Box manufacturing Close : स्वयंपाकघरातील एखादी वस्तू हरवली की, गृहिणीची चिडचिड होते. साहाजिकच स्वयंपाकघरातील सगळ्याच वस्तू या तिच्या जवळच्या असतात. हवाबंद असणाऱ्या गोष्टी त्यांना अधिक जास्त आवडतात ज्यामुळे त्याच्यात इतर अनेक पदार्थ अधिक काळ साठवता येतात.

परंतु, लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सगळ्याचा आवडता असा टपरवेअरचा टिफिन हा आता दिसेनासा होणार आहे. खाऊच्या टिफिन बॉक्सपासून ते रसरशीत मसालेदार भाज्या (Vegetable) यामध्ये सहज नेता येतात.

Tupperware Tiffin Box
Gold Silver Price Hike : सोनं पुन्हा महागलं ! मागील अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत मोजावे लागणार तब्बल 10 हजार जास्त

परंतु बीबीसी न्यूज चॅनलेच्या माहितीनुसार हवाबंद डब्यांच्या क्षेत्रात क्रांती करणाऱ्या या 77 वर्षं जुन्या अमेरिकन (America) कंपनीमध्ये आता मात्र सगळंच बिघडल्यासारखं वाटतेय. वाढणारं कर्ज, घसरलेली खप संख्या यामुळे कंपनीसमोर (Company) गुंतवणूक नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने आपल्या उत्पादनांना नवीन रुप देण्याचा प्रयत्न केला परंतु, तरुण वर्गाने त्याला खास अशी पसंती दिली नाही. 1950 ते 60 च्या दशकात टपरवेअरने ग्राहकांमध्ये क्रांती निर्माण केली.

Tupperware Tiffin Box
Medical Equipment Buying Guide : First Aid Box मधील थर्मामीटर किंवा ग्लुकोमीटर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा !

हवाबंद व द्रवपदार्थ पडणार नाही अशा उत्पादनांना त्याकाळी महिला वर्गांनी अधिक पसंती दिली होती. परंतु, युनायटेड किंग्डमध्ये याचे वितरणं 2003 पासूनचं बंद झाले आहे.

आता नव्या गुंतवणुकदारासमोर कंपनीचे स्थान टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. कोरोना काळात टपरवेअरला अधिक पसंती मिळाली होती त्यामुळे उत्पादनात बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. यावर अनेक संचालकांनी त्याचे मत ही नोंदवले आहे. कंपनीने वेळोवेळी उत्पादनात बदल केले असते तर त्याचा फायदा झाला असता असे ग्लोबल डेटाचे कार्यकारी संचालक नील साँडर्स म्हणतात.

Tupperware Tiffin Box
Diabetes Control Tips: रोज खाणाऱ्या या पदार्थांमुळे झपाट्याने वाढते रक्तातील साखरेची पातळी, वेळीच घ्या काळजी

बाजारात येणाऱ्या नवीन उत्पादनापुढे टपरवेअरचा टिफिन बॉक्स टिकून राहिल का हा प्रश्न सध्या कंपनीला सतावतो आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी टपरवेअरसमोर अनेक आव्हानं होती. कंपनी बंद होईल असे वरिष्ठांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.