Gold Silver Price Hike : सोनं पुन्हा महागलं ! मागील अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत मोजावे लागणार तब्बल 10 हजार जास्त

13th April 2023 Gold Silver Price : गुडरेटर्न्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार , गुरुवारी सोन्याचा भाव पुन्हा वाढला आहे.
Gold Silver Price Hike
Gold Silver Price HikeSaam tv

Gold Silver Rate Today : अवघ्या काही दिवसात अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त आहे. अशातच सोन्या-चांदीचा भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा विक्रमी तेजी पाहायला मिळणार आहे.

गुड रिटर्न्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार , गुरुवारी सोन्याचा भाव पुन्हा वाढला, 22 कॅरेट सोन्याच्या (Gold) 1 ग्रॅमची किंमत (Price) बुधवारी ₹ 5,570 वरून ₹ 5,620 पर्यंत वाढ झाली आहे. त्यानुसार, 22 कॅरेट सोन्याच्या 8 ग्रॅमची किंमत देखील ₹ 44,560 च्या आधीच्या आकड्यापेक्षा किंचित वाढून ₹ 44,960 वर पोहोचली. (Gold Silver Price Hike)

Gold Silver Price Hike
Gold Silver Price Hike: लग्नसराईत सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

शिवाय, वेबसाइटने सांगितले की 22 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमची किंमत ₹ 5,62,000 वर सूचीबद्ध करण्यात आली आहे, जी मागील किंमतीपेक्षा ₹ 5,000 ची वाढ आहे.

दरम्यान, 24 कॅरेट सोन्याची किंमत देखील वाढली, जी गुरुवारी ₹ 6,131 वर सूचीबद्ध झाली - मागील आकडेवारीच्या तुलनेत ₹ 55 ची वाढ . डेटावरून असे दिसून आले आहे की आज आठ ग्रॅम आणि 10 ग्रॅमची किंमत ₹ 49,048 आणि ₹ 61,310 आहे. 24 कॅरेट सोन्याचे 100 ग्रॅम ₹ 6,13,100 वर सूचीबद्ध झाले , जे मागील दिवसाच्या डेटापेक्षा ₹ 5,500 ची वाढ आहे.

Gold Silver Price Hike
How To clean Gold Jewellery : काळवंडलेल्या सोन्याच्या दागिन्यांना पुन्हा नव्यासारखे चमकवायचे आहे ? स्वयंपाकघरातील या 4 पदार्थांचा करा वापर

1. जाणून घेऊया तुमच्या शहरातील सोन्याचे भाव

चेन्नई - 61,970 रुपये

दिल्ली - 61,470 रुपये

हैदराबाद - 61,320 रुपये

कोलकत्ता - 61,320 रुपये

लखनऊ - 61,470 रुपये

मुंबई (Mumbai) - 61,320 रुपये

पुणे (Pune) - 61,320 रुपये

नागपूर - 61,320 रुपये

Gold Silver Price Hike
Gold Silver Price : सोन्याचे भाव नरमले ! खरेदी करण्याची सुर्वणसंधी, जाणून घ्या आजचे दर

2. मागच्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव

२०२२ ला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भारतात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,200 रुपये होती. 24 कॅरेट सोन्याचा दर 51,510 रुपये होता. यंदा अक्षय्य तृतीया येण्याआधीच सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळी गाठली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com