Gold Silver Price : सोन्याचे भाव नरमले ! खरेदी करण्याची सुर्वणसंधी, जाणून घ्या आजचे दर

What is the cost of 1 gram of gold : काही दिवसांच्या अंतरावर अक्षय तृतीया असताना पुन्हा सोन्या-चांदीचे भाव कमी झाले आहे.
Gold Silver Price
Gold Silver PriceSaam Tv
Published On

Gold Silver Rate Today : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशातच सातत्याने सोन्या-चांदीचे भाव हे गगनाला भिडले आहेत. ऐन लग्नसराईत सोनं-चांदी महाग झाल्याने सर्वसामान्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहीला.

गुढीपाडव्यानंतर सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतं आहे. अशातच काही दिवसांच्या अंतरावर अक्षय तृतीया असताना पुन्हा सोन्या (Gold)-चांदीचे भाव कमी झाले आहे. सध्या वीकेंडची संधी साधत अनेक नागरिकांचा कल हा सोनं खरेदीकडे दिसून येत आहे.

Gold Silver Price
Gold Price Today : हनुमान जयंतीच्या दिवशीच सोन्याने घेतली उंच उडी; चांदीचा भावही डोंगराएवढा, वाचा आजचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,870 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 766 रूपये आहे.

1. जाणून घेऊया तुमच्या शहरातील सोन्याचे भाव

  • चेन्नई - 61,530 रुपये

  • दिल्ली (Delhi) - 61,020 रुपये

  • हैदराबाद - 60,870 रुपये

  • कोलकत्ता - 60,870 रुपये

  • लखनऊ - 61,020 रुपये

  • मुंबई (Mumbai) - 60,870 रुपये

  • नागपूर - 60,870 रुपये

  • पुणे - 59,670 रुपये

Gold Silver Price
Finance Tips : नवीन वर्षात Messi प्रमाणे गुंतवणूक करायची आहे ? FIFA World Cup कडून शिकता येतील आर्थिक टिप्स

1. हॉलमार्कचे (Hallmark)सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

2. नवा नियम काय आहे ?

1 एप्रिल 2023 पासून केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल केला आहे. यात 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

Gold Silver Price
Personal Finance: नवीन वर्षात या सवयी स्वत:ला लावा; पैशांची अडचण कधीच येणार नाही

मागच्या महिन्यामध्ये भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com