Personal Finance: नवीन वर्षात या सवयी स्वत:ला लावा; पैशांची अडचण कधीच येणार नाही

जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या कर्जाची परतफेड शक्य तितक्या लवकर करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
 Money
MoneySaam TV
Published On

मुंबई : भविष्य सुरक्षित करण्यासाठी आज केलेली गुंतवणूक कामी येईल, यात शंका नाही. मात्र अजूनही काहीजण गुंतवणुकीला इतकं गांभीर्याने घेत नाहीत. गुंतवणुकीची चांगली सवय तुमची संपत्ती वाढवू शकते. नवीन वर्षात काही सवयी तु्म्ही अंगीकारल्या तर तुम्ही चांगली गुंतवणूक करुन संपत्ती वाढवू शकता.

 Money
iQOO 11 Series Launch : Vivo चा तगडा स्मार्ट फोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

स्मार्ट गोल सेट करा

कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करा. यासाठी तुम्ही गोल निश्चित करु शकता. मुलांच्या शिक्षणासाठी , रिटायमेंट फंड, ट्रिप फंड, घर खरेदी किंवा मालमत्ता खरेदीसाठी तुम्ही गोल सेट करु शकता. एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त गोल ठेवू शकते.

योग्य ठिकाणी पैसे गुंतवा

आर्थिक नियोजन करताना हेही ध्यानात ठेवले पाहिजे की पैसा सर्वत्र गुंतवू नये. तुमच्या गोलनुसार आणि जोखीम समजून गुंतवणूक करावी. जर तुम्हाला जास्त जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदार कमी जोखीम आणि दीर्घ मुदतीसाठी एसआयपी निवडू शकतात.

 Money
Apple Smartwatch : अॅपलच्या स्मार्टवॉचने वाचवला १६ वर्षीय मुलाचा जीव, ऐकून व्हाल थक्क!

आपल्या खर्चाची माहिती घ्या

तुम्ही दरमहा किती पैसे कमावता? किराणा सामान, वीज बिल, इंटरनेट कनेक्शन आणि फोन बिल यावर तुम्ही किती पैसे खर्च करता? तुम्ही आठवड्यातून किती वेळा बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता? इत्यादी तपासू शकता आणि अनावश्यक खर्च थांबवून हे पैसे गुंतवू शकता.

कर्ज ठेवू नका

जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या कर्जाची परतफेड शक्य तितक्या लवकर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण लोक प्रथम त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होम लोन, पर्सनल लोन, कार लोन किंवा क्रेडिट कार्ड यांसारखी लोन घेतात. नंतर दर महिन्याला संपूर्ण पैसा ईएमआय भरण्यात खर्च होतो. यामुळे, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन देखील करू शकत नाही.

तुमचा पोर्टफोलिओ नियमितपणे तपासा

तुमचे गोल पूर्ण करण्यासाठी अधिक गुंतवणूक आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, जर तुम्ही अनेक योजना आणि फंडांमध्ये पैसे गुंतवले असतील तर ते नियमितपणे तपासले पाहिजे. अशा परिस्थितीत, जर कोणताही स्टॉक, फंड किंवा योजना बदलण्याची गरज असेल तर तुम्ही ते करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com