Throat cancer: 99 टक्के लोकं या लक्षणांकडे करतात दुर्लक्ष; घशाचा कॅन्सर झाल्यावर शरीर काय संकेत देतं वाचा

Early signs of throat cancer: घशाचा कॅन्सर सुरुवातीला साध्या लक्षणांमधून संकेत देतो. गिळताना त्रास, आवाज बदल, सतत खोकला किंवा वजन कमी होणं ही लक्षणं दुर्लक्षित करू नका.
Throat cancer
Throat cancerSAAM TV
Published On

आजच्या बिझी शेड्युलमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आपली चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक आजार वाढल्याचं चित्र सध्या दिसून येतंय. त्यापैकी एक आजार म्हणजे घशाचा कॅन्सर. सुरुवातीला साध्या त्रासासारखी वाटणारी काही लक्षणं दुर्लक्षित केली गेली तर पुढे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

घशाचा कॅन्सर झाला की सुरुवातीच्या टप्प्यात शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. यावेळी अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही लक्षणं समजून घेणं गरजेचं असतं ही लक्षणं कोणती आहेत त्यावर एक नजर टाकूयात.

गिळताना त्रास होणं

घशाचा कॅन्सर असलेल्या व्यक्तींना गिळताना अडचण जाणवू शकते. अनेक जण याकडे दुर्लक्ष करून मऊ पदार्थ खाण्यावर भर देतात. मात्र हा त्यावर उपाय नाही. मुळात अशावेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Throat cancer
Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

आवाजात बदल होणं

ज्या व्यक्तीला घशाचा कॅन्सर होतो त्याच्या आवाजात हलका बदल समोरच्या व्यक्तीला जाणवू शकतो. यामध्ये आवाज बसणं, घसा जड झाल्यासारखा वाटणं किंवा बोलताना त्रास होणं ही लक्षणं दिसू शकतात.

कान, घसा आणि डोकेदुखी

जर कान, घसा किंवा डोक्यात सतत वेदना जाणवत असतील तर ते देखील या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, घशातील ग्रंथी सुजल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचे आहे.

घशात सतत खवखव

सतत खोकला येणं किंवा घशात सतत खवखव जाणवणं हे देखील एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. विशेषतः खोकल्यात रक्त दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. हे नेहमीच कॅन्सरचं लक्षण नसलं तरी तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे.

Throat cancer
Cholesterol signs on face: तुमच्या त्वचेमध्ये हे बदल दिसले तर समजा कोलेस्ट्रॉल वाढलंय; 8 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

दीर्घकाळ राहणारा खोकला

औषधं किंवा इतर उपाय केल्यानंतर देखील तुमचा खोकला जात नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. खूप दिवस चालणारा खोकला अनेकदा सामान्य समजून दुर्लक्षित केला जातो. हा खोकला बरेच दिवस असेल तर तो कॅन्सरचा इशारा असू शकतो.

अचानक वजन कमी होणं

कोणताही प्रयत्न न करता अचानक वजन कमी होत असेल तर ते धोकादायक ठरू शकतं. यामागे थायरॉईडसारख्या समस्या कारणीभूत असू शकतात. योग्य वेळी उपचार न केल्यास पुढे घशाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

Throat cancer
Late periods causes: मार्च महिन्यात मासिक पाळी का येते उशीरा? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com