Late periods causes: मार्च महिन्यात मासिक पाळी का येते उशीरा? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

Why periods get delayed in March month: मार्च महिन्यात मासिक पाळी उशिरा येण्यामागील कारणं जाणून घ्या. हवामानातील बदल, ताण आणि जीवनशैली यांचा पाळीवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या.
Why periods get delayed in March month
Why periods get delayed in March monthSAAM TV
Published On

मार्च महिना उलटून आता एप्रिल महिना सुरु झाला आहे. मात्र अनेक महिलांना मार्च महिन्यात एक बाब जाणवलीये. ही बाब म्हणजे मार्च महिन्यात महिलांना अनेकदा मासिक पाळी उशिरा आल्याचं जाणवतं. डॉक्टरांच्या मते, मार्च महिन्यात मासिक पाळी उशिरा येण्याची अनेक कारणे आहेत.

नर्चरमधील स्त्रीरोगतज्ञ आणि आयव्हीएफ तज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज यांनी याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मार्च महिन्यात मासिक पाळी उशीरा का येते याचा खुलासा केला आहे.

Why periods get delayed in March month
Cancer Symptoms: तरूणांनो शरीरात ही लक्षणं दिसतायत तर व्हा सावध; शरीरात सायलेंट कॅन्सर करतोय घर

हवामानातील बदल

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हवामानातील बदलांमुळे शरीरातील हार्मोनल संतुलनावर परिणाम होऊ शकतो. मार्च महिन्यात हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे हवामान बदलतं. या ऋतू बदलाचा शरीरावर परिणाम होतो. शरीराला बदलत्या हवामानाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. ज्यामुळे मासिक पाळी उशिरा येऊ शकते.

जीवनशैलीतील बदल

मार्च महिन्यात मासिक पाळी उशिरा येण्यामागे जीवनशैलीतील बदल हे देखील एक कारण असू शकतं. खाण्याच्या सवयी, झोपेचं वेळापत्रक आणि प्रवासातील बदलांमुळे या काळात लोक अधिक व्यस्त होतात. याचा शरीराच्या बायोलॉजीकल क्लॉकवर परिणाम होतो. ज्यामुळे मासिक पाळी उशिरा येऊ शकते.

Why periods get delayed in March month
Cancer Symptoms: तरूणांनो शरीरात ही लक्षणं दिसतायत तर व्हा सावध; शरीरात सायलेंट कॅन्सर करतोय घर

ताण

मासिक पाळी उशिरा येण्यामागे तुमच्या दररोजच्या आयुष्यातील तणाव हे देखील एक कारण असू शकतं. मार्च महिन्यात लोक अनेकदा काम आणि अभ्यासाच्या दबावाखाली असतात. या वाढलेल्या तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल या हार्मोनची पातळी वाढते. ज्याचा थेट परिणाम मासिक पाळीवर होतो.

डॉक्टरांच्या मते, मासिक पाळीला अधूनमधून उशीर येणं सामान्य असू शकतं. जास्त काळ उशीर होणं सामान्य नाही. जर तुमची मासिक पाळी दीर्घकाळ उशिरा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Why periods get delayed in March month
Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

  • दररोज ७ ते ८ तास झोप घ्या

  • तणाव कमी करण्यासाठी आणि तो नियंत्रित करण्यासाठी दररोज योगाभ्यास आणि ध्यान करा.

  • आरोग्यदायी आणि संतुलित आहार घ्या

  • योग्य वजन राखा

  • अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं टाळा.

Why periods get delayed in March month
Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com