Colon Cancer: कमी वयातच कोलन कॅन्सरचा धोका, ही ४ लक्षणं दुर्लक्षित करूच नका; वाचा डॉक्टरांचा सल्ला

Colorectal Cancer Symptoms: 30 ते 40 गटातील तरुणांमध्ये कोलन कॅन्सरच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये अत्यंत सामान्य वाटणारी लक्षणे सुद्धा आढळतात.
Colon Cancer
Colon Cancergoogle
Published On

सध्या तरुणांच्या खाण्यापिण्याच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होताना पाहायला मिळतायेत. घरचं अन्न नाहीतर जंक फूड हा त्यांच्या आवडीचा आहार बनला आहे. पण ते अन्न पोटाला पचत नाही. मग न कळत पोटाच्या समस्या वाढत जातात आणि भविष्यात मोठ्या जीवघेण्या आजाराला सामोरं जावं लागतं.

पुढील बातमीत तज्ज्ञांनी ४ लक्षणांबद्दल माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही लक्षणं तरुणांना मोठ्या प्रमाणात जाणवतात. त्या आजाराचं नाव म्हणजे कोलन कॅन्सर आहे. कोलन कॅन्सर हा मोठ्या आतड्यात होणारा कॅन्सर आहे. तो पचनसंस्थशी संबधित एक गंभीर आजार मानला जातो. जो ३० ते ४० वयोगटातल्या तरुणांमध्ये वाढत चालला आहे.

Colon Cancer
Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

कोलन कॅन्सरची लक्षणे कोणती?

1. घाम येणे.

उन्हाळ्यात घाम येणे ही एक सामान्य समस्या मानली जाते. पण झोपेत अचानक घाम येणं आणि सतत ही समस्या जाणवणं. तसेच ताप किंवा वजन कमी होणं अशी लक्षणं दिसणं ही कोलन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

2. शौचातून रक्त येणे.

सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे शौचातून रक्त येणे. हे कॅन्सरचे गंभीर लक्षण आहे. काही वेळा मूळव्याधेमुळेही रक्त येतं, पण वारंवार रक्तस्राव होत असेल तर तपासणी करणं महत्वाचं आहे.

Colon Cancer
Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

3. बद्धकोष्ठतेचा त्रास किंवा जुलाब होणे.

अचानक बद्धकोष्ठतेचा त्रास किंवा खूप दिवस जुलाब होणं ही लक्षणंही धोकादायक ठरू शकतात. काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ पोट साफ होण्यात बदल जाणवत असेल, शौचाची पट्टी पातळ होत असेल किंवा सतत टॉयलेटला जाण्याची भावना होत असेल तर तातडीने तपासणी करून घ्यावी.

4. थकवा जाणवणे.

नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं, सतत झोप येणं किंवा अशक्तपणा वाटणं हे सुद्धा कोलन कॅन्सरमुळे होऊ शकतं. कॅन्सरमुळे शरीरात हळूहळू रक्तस्राव होऊन हिमोग्लोबिन कमी होते आणि त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्याने व्यक्ती सतत थकलेली वाटू शकते.

टीप : ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Colon Cancer
Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com