Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

Hair Growth Tips: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना केस गळतीच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी तुम्ही सब्जा सेवन करू शकता.
Sabja Seeds For Hair Growth
best time to eat sabja seedsGoogle
Published On

उन्हाळ्यात जास्त पाणी पिणं शरीरासाठी गरजेचं असतं. पण नुसतं पाणी प्यायल्या कोणालाच आवडत नाही. मग तुम्ही लिंबू पाणी, ग्लुकोजचे पाणी किंवा सब्जाचे पाणी पिता. यासगळ्यामुळे फक्त डिहायड्रेशनचा त्रास कमी होत नाहीतर तुम्हाला इतरही फायजदे मिळतात. पुढील बातमीत आपण यातील सब्जाच्या पाण्याचे सेवन केसांच्या वाढीसाठी कधी केलं पाहिजे? याबद्दल जाणून घेणार आहोत.

सब्जा खाण्याचे फायदे

सध्याच्या खाण्यापिण्याच्या आणि लाइफस्टाइलच्या बदलामुळे अनेकांना केस गळतीच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यासाठी सब्जा फायदेशीर असतो. कारण त्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्सचे प्रमाण जास्त असते. त्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस गळण्याच्या समस्याही कमी होतात.

Sabja Seeds For Hair Growth
Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

सकाळी सब्जा खाण्याचे फायदे

सध्या हेल्दी आहारामध्ये सब्जाचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जातोय. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी चिया बिया खूप फायदेशीर मानल्या जातात. सकाळी किंवा रात्री सब्जा खाल्ल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. सकाळी सब्जाचं सेवन केल्यामुळे शरीराची चयापचय क्रिया वेगाने सुरू होते. यामध्ये असलेले ओमेगा-३, फायबर आणि प्रथिने केसांच्या वाढीस मदत करतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहिल्याने केस गळती कमी होण्यास मदत मिळते. सकाळच्या नाश्त्यात चिया बिया दही, ओट्स किंवा स्मूदीसोबत घेतल्याने शरीराला भरपूर पोषण मिळतं.

रात्री सब्जा खाण्याचे फायदे

दुसरीकडे, रात्री सब्जाचे सेवन केल्याने शरीराच्या दुरुस्ती प्रक्रियेला चालना मिळते. झोपेत असताना शरीर पोषक तत्वांचे जास्त चांगल्या प्रकारे शोषण करत असल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस जास्त मजबूत होण्यास मदत होते. भिजवलेल्या सब्जा पचनासाठीही फायदेशीर ठरतात.

तज्ज्ञांच्या मते, दिवसातून एक ते दोन चमचे सब्जाचे सेवन केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकतं. नियमित सेवन आणि संतुलित आहार यामुळे केस जास्त शायनी आणि मजबूत राहू शकता.

Sabja Seeds For Hair Growth
Driving License Rules: ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? आत्ताच करा हे काम, नाहीतर भरावा लागेल दंड; वाचा काय आहे नियम?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com