Driving License Rules: ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? आत्ताच करा हे काम, नाहीतर भरावा लागेल दंड; वाचा काय आहे नियम?

Driving License Renewal Process: ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्ही सोप्या स्टेप्सने ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि ग्रेस पीरियडची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Driving License Renewal Process
Driving License Rulesgoogle
Published On

गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स हा सर्वात महत्वाचा पुरावा मानला जातो. बरीच मंडळी एकदा लायसन्स काढतात मग त्याच्या एक्पायरी डेटकडे अजिबात पाहत नाहीत. पण एक्सपायर झालेलं लायसन्स वापरून गाडी चालवणं तुम्हाला मोठ्या मोठ्या अडचणीत आणू शकतं. मोटार वाहन कायद्यानुसार वॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवल्यावर दंड, लायसन्स रद्द होणं आणि पुन्हा टेस्ट देण्याची वेळ येऊ शकते.

ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम

मोटार वाहन अधिनियमाच्या नियमांनुसार ड्रायव्हिंग लायसन्स हे जवळपास 20 वर्षे किंवा ड्रायव्हरच्या 40 वर्षांच्या वयापर्यंत वॅलिड असतं. त्यानंतर लायसन्सचे नूतनीकरण (Renovation) करणं महत्वाचं असतं. महत्वाचं म्हणजे 50 वर्षांनंतर लायसन्सची वैधताही 5 वर्षांसाठी राहते. त्यामुळे वेळोवेळी लायसन्स तपासून त्याचं रिन्यूअल करणं गरजेचं आहे.

Driving License Renewal Process
Walk Side Effects: जास्त चालल्याने शरीरावर होतात हे वाईट परिणाम, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालं असेल तर घाबरण्याची गरज नाही. सरकारकडून 30 दिवसांचा ग्रेस पीरियड दिला जातो. या कालावधीत तुम्ही कोणताही जास्तीचा दंड न भरता लायसन्स रिन्यू करू शकता. पण ही मुदत संपल्यानंतर जास्तीचा दंड आकारला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट देण्याचीही वेळ येऊ शकते.

आजच्या डिजिटल युगात ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याची प्रक्रिया ही सर्वात सोपी झाली आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. वेबसाइटवर लॉगइन केल्यानंतर ‘ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर आपलं राज्य निवडून ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागते. पुढे रिन्यूअलचा पर्याय निवडून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. ऑनलाइन फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करता येतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेमेंटची पावती आणि अर्जाची प्रत डाउनलोड करून सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी जुने लायसन्स, आधार कार्ड, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी करावी लागते. तसेच अर्जदाराचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर मेडिकल सर्टिफिकेट म्हणजेच फॉर्म 1A सबमिट करावा लागू शकतो. ही प्रोसेस महत्वाची आहे.

Driving License Renewal Process
Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com