Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Healthy Diet : प्रोटीन हवं असेल तर तुम्हाला चिकन खावं लागेल हा समज चुकीचा आहे असं तज्ज्ञ म्हणतात. पुढील पदार्थांमधूनही तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं.
Healthy Diet
Protein Foodsgoogle
Published On

सध्याच्या तरुणाईचा फिटनेस ट्रेंड वाढत चालल्याचं सोशल मीडियावर दिसतं. सगळ्यांना छान कपडे घालायला, थोडी महागडी शॉपिंग करायला प्रचंड आवडतं. यात सोशल मीडियावर त्याच्या स्टोरीज ठेवायलाही अनेकांना प्रचंड आवडतं. पण फिटनेससाठी तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते, त्यामध्ये जीम हा महत्वाचा मुद्दा येतोच. त्याचसोबत तुमचं डाएट हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो.

अनेक जीम करणाऱ्या व्यक्तींना किंवा ज्यांना फिटनेस आवडतो, त्यांना वाटतं की चिकन किंवा प्रोटीन पावडर खाल्ल्यानेच प्रोटीन मिळतं. पण हा समज चुकीचा आहे, असं तज्ज्ञ म्हणतात. यामध्ये जर काही व्यक्ती शाहाकारी असतील तर त्यांना वाटतं की फिटनेससाठी प्रोटीन पावडर, गोळ्या आणि चिकनचं खावं लागेल. पण तुम्ही आहारात अनेक व्हेज गोष्टींचा समावेश करू शकता. त्याची यादी पुढील प्रमाणे आहे. हे पदार्थ तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी आणि फिटराहण्यासाठी फायदेशीर ठरतील.

Healthy Diet
FD Calculation: महिन्याला ₹१०,००० हजाराचं व्याज हवयं? वाचा एफडीचं कॅलक्युलेशन

दही: २०० ग्रॅम दह्यातून तुम्हाला 20 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं. त्यासोबत तुम्ही फळं, ड्रायफ्रूट्स किंवा बियांचे सेवन करू शकता. त्याने दही पौष्टिक बनतं.

पनीर : पनीर तुम्हाला डेअरीमध्ये सहज मिळेल. 100 ग्रॅम पनीरमध्ये जवळपास 18 ग्रॅम प्रोटीन असतं. नुसतं पनीर नाही तुम्ही त्याची पनीर भुर्जी, सलाड किंवा ग्रिल्ड पनीर असे पदार्थ बनवून सर्व्ह करू शकता.

सोयाबीन: कमी खर्चात जास्त प्रोटीन हवं असेल तर सोयाबीन हा बेस्ट पर्याय ठरतो. फक्त 50 ग्रॅम सोयाबीनमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे फिटनेसकडे लक्ष देणाऱ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढतेय.

अंडी: अंडी हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. ४ अंड्यांमधून तुम्हाला जवळपास 24 ग्रॅम प्रोटीन मिळतं. सकाळच्या नाश्त्यासाठी ऑम्लेट किंवा भुर्जी हा चांगला पर्याय आहे .

भाजलेले चणे: 100 ग्रॅम भाजलेल्या चण्यांमध्ये जवळपास 20 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे भूक भागवण्यासोबतच शरीरालाही आवश्यक पोषण मिळतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Healthy Diet
18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com