Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Blood Sugar: उन्हाळ्यात शरीरात काही बदल होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे डायबिटीजची असू शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
Prediabetes Symptoms
Blood SugarGoogle
Published On

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये, झोपेच्या वेळेत आणि व्यायाम न करणं अशी जीवनशैली अनेकजण जगत आहेत. पण यासगळ्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

तज्ज्ञांच्या मते तुम्हाला सामान्य वाटणाऱ्या चुका भविष्यात प्री- डायबेटीज या आजाराला निमंत्रण देतात. तुम्ही अशावेळेस सावध राहून तुमच्या शरीरातल्या अचानक होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जेव्हा प्री- डायबेटीजची लागण होते, तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीच ठळक लक्षणं जाणवत नाहीत. चला जाणून घेऊयात प्री- डायबेटीजची सुरुवातीची लक्षणे.

१.सतत तहान लागणे.

सतत तहान लागणं ही सामान्य समस्या आहे. त्यात उन्हाळ्यात ही समस्या जाणवतेचं. पण त्यासोबत सतत लघवी होणं ही समस्या असेल तर तुम्ही प्री-डायबिटीजची तपासणी केली पाहिजे. यामध्ये शरीरातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मूत्रपिंडांवर जास्तीचा ताण येतो.

Prediabetes Symptoms
Post Office Scheme: दिवसाला ३३३ रुपये गुंतवा अन् ₹१७००००० मिळवा; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

२. थकवा जाणवणे

पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर थकवा जाणवत असेल तर ते सुद्धा धोक्याचं लक्षण असू शकतं. यामध्ये जेव्हा शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी ग्लुकोज योग्य प्रकारे वापरता येत नाही तेव्हा अशक्तपणा आणि आळस मोठ्या प्रमाणात वाढतो.

३. धूसर दिसणे

तुम्हाला जर अचानक जवळचं किंवा लांबचं धूसर दिसत असेल तर हे प्री-डायबेटीजचं लक्षण असू शकतं. यामध्ये रक्तातल्या साखरेच्या पातळीत सतत बदल झाल्यावर डोळ्यांच्या लेन्सवर परिणाम होतो आणि दिसण्यात अडचणी निर्माण होतात. याशिवाय हात-पायांमध्ये मुंग्या येतात, जळजळ होते किंवा बधिरपणा जाणवतो. त्यामुळे ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Prediabetes Symptoms
Jio Recharge: Free Netflix अन् 100GB डेटा, Jio च्या या रिचार्ज किंमत फक्त...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com