Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Sakshi Sunil Jadhav

हिऱ्याची माहिती

प्रत्येकालाच वाटतं की त्याच्याकडे हिरा असावा. पण अर्थातच ते खूप महाग असतात. अनेकांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसते. पुढील माहितीत आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत.

largest diamonds in the world

सर्जिओ (Sergio)

जगातल्या सर्वात महागड्या हिऱ्यांमध्ये सर्जिओ (Sergio) याचा समावेश होतो. १८९५ मध्ये ब्राझीलमध्ये हा हिरा सापडला. याचा रंग काळा आहे. महत्वाचं म्हणजे हा हिरा ३१०६.७५ कॅरेटचा आहे.

top 10 diamonds Sergio

कलिनन डायमंड (Cullinan Diamond)

१९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत हा हिरा सापडला. जो ३१०६.७५ कॅरेटचा आहे. याचे ९ मोठे आणि ९६ छोटे तुकडे करण्यात आले.

Cullinan Diamond

लेसेडी ला रोना (Lesedi La Rona)

११११ कॅरेटचा हा लेसेडी ला रोना हिरा आहे. २०१५ मध्ये बोत्सवानामध्ये हा हिरा सापडला. हा सर्वात मोठा आणि रफ असा हिरा आहे.

Lesedi La Rona

एक्सेल्सिअर डायमंड (Excelsior Diamond)

कलिनन हिऱ्याचा शोध लागण्यापूर्वी जगातला सर्वात मोठा हिरा एक्सेल्सिअर डायमंड हा होता. ९९५.२ कॅरेटचा हा हिरा १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडला.

Excelsior Diamond

स्टार ऑफ सिएरा लिओन (Star of Sierra Leone)

९६९ कॅरेटचा स्टार ऑफ सिएरा लिओन हा हिरा सिएरा लिओनमध्ये सापडला. सुरुवातीला याचा एक मोठा तुकडा होता त्याचे १७ तुकडे करण्यात आले.

Star of Sierra Leone

इनकंपेरेबल (Incomparable)

१९८९ मध्ये इनकंपेरेबल हिऱ्याचा शोध लागला. चार वर्षे यावर अभ्यास करून याचं कटिंग केलं. तर हा हिरा ८९० कॅरेटचा आहे.

Incomparable

कॉन्स्टेलेशन (Constellation)

कॉन्स्टेलेशन या हिऱ्याचा शोध २०१५ मध्ये लागला. जो बोत्सवानाच्या कारोवे खाणीत होता.

Constellation

कोहिनूर (Kohi-Noor)

कोहिनूर हा हिरा जगातला ऐतिहासिक हिरा आहे. जो ७९३ कॅरेटचा आहे. १३ व्या शतकात गोलकोंडा या भारतातल्या एका खाणीत याचा शोध लागला.

Kohi-Noor

मिलेनियम स्टार (Millennium Star)

१९९० मध्ये लोकशाही प्रजासत्ताक कॉंगोमध्ये हा ७७७ कॅरेटचा हिरा सापडला. त्यातून २०३.०४ कोटींचा नाशपती (Pear-shaped) आकाराचा शुद्ध हिरा तयार केला गेला.

Millennium Star

वोई रिव्हर (Woyie River)

वोई रिव्हर हा हिरा ७७७ कॅरेटचा आहे. १९४५मध्ये सिएरा लिओन मधल्या वोई नदीत याचा शोध लागला. पुढे त्याचे ३० तुकडे करण्यात आले. त्यातला मोठा तुकडा हा 'व्हिक्टरी डायमंड' म्हणून ओळखला जातो.

Woyie River

NEXT: जेवणासाठी काहीतरी झटपट आणि पौष्टीक खायचंय? बनवा गरमागरम गव्हाची खिचडी, वाचा रेसिपी

Gavhachi Khichdi Recipe
येथे क्लिक करा