Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला जर काहीतरी गरमागरम, पौष्टिक आणि पोट भरेल असा पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर गव्हाची खिचडी बेस्ट पर्याय आहे.
दोन वाटी गव्हाची जाड सोजी, १ वाटी तूर डाळ किंवा मूग डाळ, कांदा, लसूण, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, २ चमचे तिखट, १ चमचा काळा मसाला, चवीनुसार मीठ.
गव्हाची थुली हा ग्रामीण महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे. सुरुवातीला गव्हाची जाड सोजी कोरडी आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
गव्हाची थुली हा पदार्थ पचायला हलका आणि पौष्टिक मानला जातो. त्यानंतर कढईत फोडणी करून त्यामध्ये पाणी घालावे.
गव्हातील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पाण्याला उकळी आल्यावर भाजलेली सोजी टाकावी. सोजी पाच मिनिटे शिजू द्या.
तूर किंवा मूग डाळ वापरल्यावर प्रोटीनचं प्रमाण वाढतं. पावसाळ्यात गरमागरम थुली खाल्ल्याने शरीराला उब मिळते. त्यानंतर डाळ घालून कुकरमध्ये ४ ते ५ शिट्ट्या द्याव्यात.
काळा मसाला आणि लसूण यामुळे पदार्थाची चव अधिक वाढते. लोणचे आणि पापडासोबत थुली खाण्याची खास परंपरा आहे. कमी तेलात तयार होत असल्याने हा हेल्दी पर्याय ठरतो.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा घरगुती पदार्थ आहे. गरमागरम थुलीवर फोडणीचे तेल टाकून लोणचे आणि पापडासोबत सर्व्ह करावी.