Sugar Risk Heart Attacks: साखरेमुळे केवळ डायबेटीजच नाही तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो? संशोधनातून धक्कादायक बाब उघड

Sugar Risk Heart Attacks Research: नवीन वैद्यकीय संशोधनानुसार जास्त प्रमाणात साखर सेवन केल्याने केवळ मधुमेहच नव्हे तर हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. या निष्कर्षामुळे आरोग्य तज्ञांनी लोकांना साखरेचे सेवन मर्यादित करण्याचा सल्ला दिला आहे.
Sugar Risk Heart Attacks Research
Sugar Risk Heart Attacks Researchsaam tv
Published On

आपल्यापैकी अनेकांना गोड खायला खूप आवडतं. मग त्यामध्ये चॉकलेट असो किंवा एखादी मिठाई...तर काही जणं अशी असतात ज्यांना जेवणानंतर गोड खायला खूप आवडतं. आतापर्यंत जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यास मधुमेह होतो असा अनेकांचा समज असतो. मात्र तुम्हाला माहितीये का जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकते.

काही अभ्यासांमधून असं समोर आलंय की, ज्या व्यक्तींचं कोलेस्ट्रॉल कमी होतं मात्र ते जास्त साखरेचं सेवन करत होत्या अशा व्यक्तींना हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका असतो.

संशोधनातून काय समोर आलं?

BMC Medicine मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, फ्री शुगर जसं की, प्रोसेस्ड फूडमध्ये घातलेली साखर, कोल्ड ड्रिंक्स, फ्रुट ज्यूस किंवा सिरप्स यांचा जास्त वापर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो. या संशोधनात ३७ ते ७३ वयोगटातील ११०००० पेक्षा जास्त यूकेतील नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. तब्बल ९ वर्ष या व्यक्तींचा डेटा तपासण्यात आला. यानंतर शुगर फ्रीचं सेवन ५ टक्क्यांनी वाढल्यास हृदयविकाराचा धोका ६ टक्क्यांनी आणि स्ट्रोकचा धोका १० टक्क्यांनी वाढत असल्याचं समोर आलं.

Sugar Risk Heart Attacks Research
Can Tattoos Cause Cancer : सावधान! 'टॅटू'मुळे तुम्हालाही होऊ शकतो कर्करोग; अभ्यासातून समजली धक्कादायक माहिती

या संशोधनाचे अभ्यासक कोडी वॉटलिंग यांनी सांगितलं की, या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांनी जॅम, मिठाई, फ्रुट ज्यूस, कोल्डड्रींक आणि डेझर्ट्स असे साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ले होते. यामध्ये सर्वाधिक धोका असलेल्या ग्रुपने दररोज सुमारे ९५ ग्रॅम साखरेचं सेवन केलं होतं.

साखर हार्ट अटॅकचा धोका कसा वाढवते?

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने यकृतावर त्याचा ताण येतो. यकृत कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर चरबीमध्ये करतं आणि साखरेचं मेटाबॉलिझम अल्कोहोलसारखेच करतं. यामुळे लिव्हरमध्ये चरबी साठते आणि फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. परिणामी डायबेटिस आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Sugar Risk Heart Attacks Research
Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने Inflammation आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. या दोन्ही गोष्टी हार्ट अटॅक येण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे वजन वाढणं, मधुमेह, फॅटी लिव्हर या गोष्टी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकशी संबंधित असतात.

अभ्यासात असंही आढळलं की, दररोज ५ ग्रॅम फायबर सेवन केल्यास हार्ट अटॅकचा धोका ४% ने कमी होतो. मात्र शरीराच्या वजनाचा विचार केल्यावर हा संबंध कमी झाल्याचं दिसून आलं आहे. २०१४ मध्ये JAMA Internal Medicine मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं पाहायला मिळालं की, ज्या व्यक्ती जास्त प्रमाणात साखर सेवन करत होत्या त्या लोकांना हार्ट अटॅकमुळे मृत्यूचा धोका ३८% ने जास्त होता.

Sugar Risk Heart Attacks Research
Heart Attack: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तींना सर्वाधिक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते? अभ्यासातून धक्कादायक बाब उघड

हृदयविकाराचा धोका कसा कमी करावा?

या संशोधनात मध, सिरप्स आणि फ्रुट ज्यूस यांच्यातील साखरेचाही अभ्यास करण्यात आला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, साखर आणि स्ट्रोक यांचा संबंध जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

Sugar Risk Heart Attacks Research
Blood Test: ब्लड टेस्ट तुम्हाला सांगू शकते मृत्यू धोका; नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com