Blood Test: ब्लड टेस्ट तुम्हाला सांगू शकते मृत्यू धोका; नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

Can Blood Test Predict Disease: नवीन वैद्यकीय संशोधनानुसार साध्या रक्त तपासणीद्वारे व्यक्तीच्या मृत्यूचा धोका ओळखता येऊ शकतो. या निष्कर्षामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Can Blood Test Predict Disease
Can Blood Test Predict Diseasesaam tv
Published On

कोणत्याही आजाराचं निदान करायचं असेल तर त्याची लक्षणं समजून घेतली पाहिजे. असंच नव्या केलेल्या एका संशोधनाने असे संकेत दिल आहेत की, आपल्या रक्तात असलेले काही प्रोटीन हे भविष्यात गंभीर आजारांचे आणि मृत्यचे संकेत देतात.

सरे युनिवर्सिटीच्या सगळ्या संशोधकांकडून केलेल्या या अभ्यासात युकेच्या बायोबँकेच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ३९ ते ७० वर्षांच्या ३८ हजारांपेक्षा अधिक लोकांचे ब्लड सँपल आणि आरोग्याची माहिती घेण्यात आली.

Can Blood Test Predict Disease
Alcohol stay in body: दारू प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात किती वेळ अल्कोहोल राहतं? डॉक्टरांनी दिली आश्चर्यकारक माहिती

रिसर्चमधून काय समोर आलं?

या अभ्यासादरम्यान संशोधकांनी प्रत्येक ब्लड सँपलमध्ये असलेल्या जवळपास ३००० प्रोटीनची तपासणी केली. यावेळी त्यांनी हे पाहलं की कोणत्या प्रोटीनचा स्तर ५ ते १० वर्षांच्या आत नॉन एक्सीडेंटल मृत्युशी जोडला होता.

या रिपोर्टनुसार, पूर्ण रिसर्चच्या दरम्यान वय, बीएमआय आणि स्मोकिंगसारख्या धोकादायक घटकांचा विचार केला गेला. यानंतर असे शेकडो प्रोटीन सापडेल ज्यांचा संबंध कॅन्सर, हृदयरोग आणि इतर आजारांशी होता, ज्यामुळे मृत्यू होण्याचा धोका होता. ही सर्वात धोकादायक बाब होती.

Can Blood Test Predict Disease
Cancer threat India: भारतासाठी मोठा धोका बनतोय कॅन्सर! 2040 पर्यंत रूग्णांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहोचण्याचा इशारा

संशोधकांनी काय शोधून काढलं?

संशोधकांनी या रिसर्चच्या आधारे काही छोट्या प्रोटीनचं पॅनल तयार केलं. ज्यामधील एका पॅनलमघ्ये १० प्रोटीनचा समावेश होता, ज्याचा १० वर्षांच्या आता मृत्यू होण्याशी संबंध होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रक्तात असलेले काही प्रोटीन शरीराच्या आत धीम्या गतीने सुरु असलेल्या बायोलॉजिकल प्रोसेस जसं की, सूज, अवयवांवर ताण आणि इम्युन सिस्टीमच्या समस्यांची माहिती देतं. ज्यांची लक्षणं ही दिसून आलेली नसतात.

Can Blood Test Predict Disease
Mistake after dinner: रात्रीच्या जेवणानंतर तुमची ही चूक आरोग्यासाठी पडेल महागात; तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

संशोधकांनी हे स्पष्ट केलंय की, ही टेस्ट कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूची वेळ ठरवत नाही. याला आपण एक अर्ली वॉर्निंग सिस्टीमच्या रूपाने पाहिलं पाहिजे. ज्यामुळे आपण वेळीच तपासणी आणि आजाराला रोखू शकतो. आरोग्य तज्ज्ञांनुसार, जर पुढच्या काही अभ्यासांमध्ये याबाबत पुरेसे पुरावे सापडले तर भविष्यात अशी ब्लड टेस्ट फायदेशीर ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com