Blood Sugar Level: ब्लड शुगर टेस्ट करताय, तर या कॉमन चुका लगेच टाळा, अन्यथा...

Common Mistakes Blood Sugar Testing: मधुमेह नियंत्रणासाठी नियमित ब्लड शुगर तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अनेकदा लोक तपासणी करताना काही सामान्य चुका करतात ज्यामुळे निकाल चुकीचा येतो आणि उपचारात अडथळे निर्माण होतात.
Common Mistakes Blood Sugar Testing
Common Mistakes Blood Sugar Testingsaam tv
Published On

मधुमेही रूग्णांनी वेळोवेळी त्यांच्या रक्तातील साखर तपासली पाहिजे. तपासणी करत असताना रिडींग अचूक मिळणं फार गरजेचं असतं. यासाठी योग्य पद्धतीने ब्लड शुगरची तपासणी केली पाहिजे. अनेकजण ब्लड शुगर लेवल तपासताना काही चुका करतात. ज्यामुळे रिडींग चुकीचं मिळू शकतं. मधुमेही रूग्णांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते पाहूयात.

ब्लड शुगर लेवल तपासताना या चुका टाळा

चुकीच्या वेळी तपासणी करणं

जेवल्यानंतर लगेच ब्लड शुगर लेवल तपासल्यास रिडींग हाय दाखवली जाऊ शकते. अशावेळी जेवणाच्या दोन तासांनी तपासणी करावी.

Common Mistakes Blood Sugar Testing
Liver Cancer Symptoms: लिव्हर कॅन्सर असणाऱ्यांना जाणवतात 'ही' प्रमुख लक्षणं; वेळीच सावध व्हा, नाहीतर...

बोटांच्या टोकाला तपासणं

बोटांच्या टोकाला जास्त Nerve Endings असतात. त्यामुळे त्याठिकाणी तपासणी केल्यास वेदना जास्त होतात. त्याऐवजी बोटांच्या बाजूला टोचल्यास कमी त्रास होतो.

लॅन्सेट न बदलणं

लॅन्सेट पुन्हा वापरल्यास वेदना होऊ शकतात. इतकंच नाही तर यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे लॅन्सेट नियमितपणे बदलणं गरजेचं आहे.

हात न धुता तपासणी करणं

मधुमेहाची रूग्णांनी ब्लड शुगर तपासताना हात साबणाने हात स्वच्छ केले पाहिजेत. हात स्वच्छ न करता रिडींग घेतल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

Common Mistakes Blood Sugar Testing
Heart Disease: हृदयविकाराआधी शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच घ्या काळजी, अन्यथा जीवाला धोका

टेस्ट स्ट्रिप्स न तपासणं

एक्सपायर झालेले किंवा योग्य पद्धतीने साठवणूक न केलेले टेस्ट स्ट्रिप्स चुकीचे परिणाम देऊ शकतात. त्यामुळे नेहमी स्ट्रिप्सची एक्सपायरी डेट तपासा आणि त्यांना योग्य प्रकारे साठवणूक करा.

सॅनिटायझर वापरणं

तपासणी करण्यापूर्वी बोटं स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरल्यास त्वचा कोरडी पडते आणि वेदना होऊ शकतात. त्याऐवजी बोटं स्वच्छ करण्यासाठी साबण आणि पाणी वापरणं अधिक सुरक्षित आहे

Common Mistakes Blood Sugar Testing
Early Signs of Lung Cancer: बोटं आणि नखांवर फुफ्फुसांच्या कॅन्सरची दिसतात 'ही' लक्षणं; चुकूनही इग्नोर करू नका

ग्लुकोज मीटरची माहिती नसणं

ग्लुकोज मीटर योग्य प्रकारे कसं वापरायचं याची माहिती नसल्यास तपासणीत चुका होऊ शकतात. अशावेळी गरज असल्यास तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता.

जेवणाच्या वेळा टाळणं

जेवणाच्या वेळा टाळण्याने ब्लड शुगर लेवल वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे कमी खाणं आणि वेळेवर खाणं यामुळे योग्य रिडींग मिळण्यास मदत होते.

Common Mistakes Blood Sugar Testing
Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com