Heart Disease: हृदयविकाराआधी शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच घ्या काळजी, अन्यथा जीवाला धोका

Symptoms Of Early Heart Disease: जर एखाद्या व्यक्तीला कोणताही गंभीर आजार असेल तर शरीर वेळीच संकेत देत असतं. तसेच शरीरात सामान्य दिसणारी काही लक्षणे हदयरोगाच्या सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
Symptoms Of Early Heart Disease
heart diseasesaam tv
Published On

निरोगी आरोग्यासाठी हृदयाचे निरोगी राहणे गरजेचे आहे. यासाठी दैनंदिन जीवनात व्यायाम, ध्यान, हेल्दी आहार सारख्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. परंतु, गेल्या काही वर्षांत हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. खराब जीवनशैली आणि अनहेल्दी आहारामुळे हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. आरोग्य तज्ञांच्या मते, जर हृदयरोग लवकर निदान झालं तर वेळीच उपचार केले जाऊ शकतात आणि एखाद्याचा जीव वाचवला जाऊ शकतो. हदयरोग असल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.

शरीरात उर्जेचा अभाव

जेव्हा हदय योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. जर तुम्हाला आराम करुनही वेळोवेळी थकवा जाणवत असेल किंवा कोणतेही काम न करता अशक्तपणा जाणवत असेल तर हे हदयाशी संबधित आजाराचे लक्षण असू शकते. याशिवाय जे लोक हृदयाशी संबधित आजाराने ग्रस्त असतात त्यांना चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

Symptoms Of Early Heart Disease
Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

विनाकारण घाम येणे

काहीही काम न करता विनाकारण घाम येणे ही सामान्य गोष्ट नाही म्हणून याकडे दुर्लक्ष करु नका. विनाकारण घाम येणे हे हृदयाशी संबधित आजाराचे संकेत असू शकते. याशिवाय पायाला किंवा टाचाला सूज येणे हे हृदयरोगाचे लक्षण आहे. जर तुम्हाला अशी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

श्वास घेण्यास त्रास होणे

छातीत दुखणे किंवा जडपणा जाणवणे हे देखील हृदयरोगाचे लक्षण असू शकते. जर तुमच्या हृदयाचे ठोके अचानक वाढत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. अन्यथा याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच श्वास घेण्यात त्रास होणे किंवा दम लागणे हे देखील हदयरोगाचे सुरुवातीचे लक्षण आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Symptoms Of Early Heart Disease
WhatsApp: व्हॉट्सॲपचे 'हे' बेस्ट फिचर्स तुम्हाला माहित आहे का? प्रत्येकाने वापरलेच पाहिजे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com