ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल मोबाईल हा फक्त संवाद साधण्यासाठीचे माध्यम न राहता दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे.
मोबाईलमध्ये प्रायव्हेट फोटोज, डॉक्युमेन्ट आणि बॅकिंग संबधित माहिती असतात. अशा परिस्थितीत, जर तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुमचा सर्व डेटा हरवतो.
केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलच्या मदतीने तुमचा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवता येतो.
सर्वप्रथम, तुमच्या जवळच्या पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा एफआयआर दाखल करा.
तक्रार केल्यानंतर, तुम्हाला एक तक्रार क्रमांक मिळेल. ज्याच्या मदतीने CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवणे सोपे होईल.
पोर्टल उघडल्यानंतर, ब्लॉक किंवा चोरीला गेलेला मोबाईल या पर्यायावर क्लिक करा. मग तुमच्या मोबाईलशी संबंधित सर्व माहिती येथे भरा.
त्यानंतर, तुमची एफआयआर प्रत, मोबाईलची माहिती , चोरी कधी आणि कुठे झाली याची माहिती भरा आणि सबमिट करा.