Cancer threat India: भारतासाठी मोठा धोका बनतोय कॅन्सर! 2040 पर्यंत रूग्णांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहोचण्याचा इशारा

Cancer statistics India: भारतामध्ये कॅन्सर हा मोठा आरोग्य धोका बनत चालला आहे. तज्ञांच्या मते, २०४० पर्यंत देशातील कॅन्सर रुग्णसंख्या २० लाखांपर्यंत पोहोचू शकते. ही आकडेवारी चिंताजनक असून आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे.
Cancer statistics India
Cancer statistics Indiasaam tv
Published On

कॅन्सर ही संपूर्ण जगाची एक मोठी आरोग्याची समस्या बनलीये. सध्याच्या काळात कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना कॅन्सरचं निदान होण्याची शक्यता आहे. तरूणाईमध्येही कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. चुकीची लाईफस्टाईल, वाढतं वय, प्रदूषण आणि अयोग्य आहार ही हा गंभीर आजार वाढण्यामागे कारणं आहेत. दरम्यान यावर आता केंद्र सरकारने देखील चिंता व्यक्त केलीये.

केंद्रीय राज्य मंत्री. डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत माहिती देताना सांगितलं की, जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर २०४० पर्यंत भारतात कॅन्सरच्या रूग्णांची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा फक्त भीतीदायक नाही तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी मोठा इशारा आहे.

Cancer statistics India
CT scan cancer risk: CT स्कॅनमुळे दरवर्षी 103,000 लोकांना होतोय कॅन्सर; नव्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा

भारतावर वाढतोय कॅन्सरचा ताण

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीन आणि अमेरिकेनंतर भारतात सर्वात जास्त कॅन्सर पेशंटची नोंद करण्यात आली आहे. आजारांचं स्वरूप बदलत असून जे आजार वयस्कर व्यक्तींना होत होते ते आता कमी वयाच्या व्यक्तींना होताना दिसतायत. कॅन्सर हा त्यापैकीच एक आहे.

2040 पर्यंत कॅन्सरचे रूग्ण का वाढणार?

वयस्कर व्यक्तींची संख्या वाढतेय

भारतात ६० वर्षांपेक्षा जास्त व्यक्तींची संख्या वाढताना दिसतेय. कॅन्सरचा धोका हा वाढत्या वयानुसार, जास्त असतो. त्यामुळे वयस्कर व्यक्तींची संख्या वाढल्यानंतर कॅन्सरच्या रूग्णांमध्येही वाढ होतात. काही अभ्यासानुसार, ६० ते ७४ वर्षांच्या व्यक्तींमध्ये कॅन्सरचा धोका वाढलेला असतो.

Cancer statistics India
Lower Cancer Risk Drink: 'ही' तीन पेय महिन्यातून एकदा प्यायलात तर कायमचा ठळेल कॅन्सरचा धोका

लाईफस्टाईमुळे बिघडलेल्या सवयी

आजकालची लाईफस्टाईल इतकी चुकीची आहे की ती कॅन्सरला आमंत्रण देतं. मेडिकल रिसर्चनुसार, भारतात ७० टक्के कॅन्सरची प्रकरणं रोखली जाऊ शकतात. यासाठी आपल्या काही सवयींमध्ये बदल केला पाहिजे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंबाखू, गुटखा आणि दारूचं सेवन. जंक फूडचं सेवन, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचाल कमी होणं हे घटक देखील कारणीभूत ठरतात.

Cancer statistics India
Brain Cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापुर्वी डोकंच नाही तर ही गंभीर लक्षणं दिसतात, या समस्यांना दुर्लक्षित करणं आत्ताच टाळा

प्रदूषण देखील बनतोय मोठा धोका

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, वायू प्रदूषणामुळे कॅन्सर पसरला जातो. भारतात अनेक शहरांमध्ये PM2.5 चा स्तर धोक्यापेक्षा जास्त आहे. दीर्घकाळ प्रदूषित हवेत श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

Cancer statistics India
Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com