Red eyes in the morning: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल दिसतात? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' गंभीर आजार

Red eyes after waking up: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल का होतात? डोळ्यांमधील कोरडेपणा, अॅलर्जी, संसर्ग आणि रक्तवाहिनी फुटण्याची कारणं जाणून घ्या. डोळे लाल असल्यास कोणती लक्षणं धोकादायक आहेत आणि डॉक्टरांकडे कधी जावं, याबद्दल जाणून घ्या.
Red eyes in the morning
Red eyes in the morningsaam tv
Published On: 

अनेकदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल झाल्याचं दिसतं. काही वेळा झोप पूर्ण न होणं, डोळ्यांमध्ये कोरडेपणा किंवा धूळ-माती डोळ्यांत गेल्यामुळे असं होऊ शकतं. पण रोज सकाळी डोळे खूप लाल दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण यामागे डोळ्यांशी संबंधित काही समस्या असू शकतात. डोळ्यातील एखादी छोटी रक्तवाहिनी फुटणं, अॅलर्जी, संसर्ग किंवा पापण्यांना सूज येणं अशी त्याची कारणं असू शकतात.

सकाळी डोळे लाल होण्यामागे काय कारणं असतात?

सकाळी डोळे लाल होण्याचं एक कारण म्हणजे सबकंजंक्टिव्हल हेमरेज. या समस्येमध्ये डोळ्याच्या पांढऱ्या भागावर असलेली छोटी रक्तवाहिनी फुटते. त्यामुळे डोळ्याच्या पांढऱ्या भागावर रक्त साचल्यासारखा लाल डाग दिसतो. जोरात खोकला येणं, शिंक येणं, डोळे जोरात चोळणं किंवा जड वजन उचलणं यामुळे असं होऊ शकतं.

Red eyes in the morning
Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलेलं असताना या 5 ड्रिंक्सचं सेवन म्हणजे जणू विषच; कमी वयातच येईल हार्ट अटॅक

याशिवाय डोळ्यांमधील कोरडेपणा म्हणजेच ड्राय आयची समस्याही डोळे लाल होण्याचं कारण ठरू शकते. रात्री झोपताना डोळ्यांमधील ओलावा कमी झाल्यास सकाळी डोळे लाल दिसतात. त्याचप्रमाणे पंखा किंवा एसीची हवा थेट डोळ्यांवर येत असेल, तरीही डोळ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होऊ शकतो.

Red eyes in the morning
High Cholesterol: कोलेस्ट्रॉल फक्त हृदयाच्या नसांमध्येच नाही, तर पायांच्या नसांमध्येही साचतं! दुर्लक्ष केल्यास पाय कापण्याची येऊ शकते वेळ

संसर्ग आणि अॅलर्जीमुळेही डोळे होतात लाल

डोळे लाल होण्यामागे कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येण्याची समस्याही असू शकते. हा त्रास संसर्ग किंवा अॅलर्जीमुळे होतो. संसर्ग झाल्यास डोळे लाल होतात आणि त्यातून पाणी येऊ शकतं. सकाळी झोपेतून उठल्यावर पापण्यांवर चिकट पदार्थ किंवा घाण जमा झालेली दिसू शकते.

तर अॅलर्जीमुळे डोळ्यांना खाज येणं आणि डोळ्यांतून पाणी वाहू लागतं. याशिवाय ब्लेफेरायटिस नावाची समस्याही डोळे लाल होण्यास कारणीभूत ठरू शकते. यामध्ये पापण्यांच्या कडांना सूज येते. त्यामुळे डोळ्यांना जळजळ होणं, डोळे लाल होणं आणि पापण्यांवर खपल्या जमा होणं अशा समस्या जाणवतात.

डोळे लाल असल्यास डॉक्टरांकडे कधी जावं?

कधीतरी सकाळी उठल्यानंतर डोळे थोडे लाल दिसत असतील आणि काही वेळाने ही लालसरपणा कमी होत असेल, तर त्यामागे थकवा किंवा डोळ्यांमधील कोरडेपणा कारणीभूत असू शकतो. मात्र, वारंवार डोळे लाल होत असतील, तर डोळ्यांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

Red eyes in the morning
High Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय? हे 5 पदार्थ खेचून बाहेर काढतील रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी

डोळ्यांमध्ये खूप वेदना होणं, धूसर दिसणं, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणं किंवा डोळ्यांतून घट्ट पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा चिकट पदार्थ येणं अशी लक्षणं दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.