

आजकाल कमी वयातच अनेकांना हृदयाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतोय. अगदी १८ वर्षांच्या तरुणांमध्येही लठ्ठपणा आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची समस्या दिसून येतेय. पण कमी वयातच या समस्या का वाढत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं.
काही ड्रिंक्समध्ये साखर आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं. हे ड्रिंक्स जर तुम्ही सतत पीत असाल तर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे चवीला छान लागणारी ही पेयं पिताना काळजी घेणं गरजेचं आहे.
आईस्क्रीमपासून बनवलेले शेक आणि इतर पेयं अनेकांना आवडतात. मात्र यामध्ये साखर आणि फॅटचं प्रमाण जास्त असू शकतं. अशी पेयं नियमित प्यायल्यास वजन वाढण्यासोबतच बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचाही धोका असतो.
केशर मलाई दूध, रबडी, लस्सी आणि ताक चविष्ट बनवण्यासाठी अनेकदा त्यात भरपूर मलाई आणि लोणी घातलं जातं. यामुळे या पेयांमधील फॅटचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अशा पेयांचं जास्त सेवन करणं टाळावं.
जास्त फॅट असलेल्या दुधाचं सेवन केल्याने शरीरातील चरबी आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. यातील सॅच्युरेटेड फॅटचं जास्त सेवन केल्यास रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका वाढतो.
चहा आणि कॉफीचं अतिसेवनही टाळायला हवं. फिल्टर न केलेल्या कॉफीमध्ये डायटरपीन (Diterpenes) नावाचा घटक असतो. हे घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करणाऱ्या प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.
नारळ आणि काजूपासून तयार केलेली घट्ट पेयं अनेकजण आवडीने पितात. पण त्यात साखर किंवा जास्त फॅट घातलं असल्यास त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. अशा ड्रिंक्सचं जास्त सेवन केल्याने रक्तातील साखर आणि चरबीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.