High Cholesterol: कोलेस्ट्रॉल फक्त हृदयाच्या नसांमध्येच नाही, तर पायांच्या नसांमध्येही साचतं! दुर्लक्ष केल्यास पाय कापण्याची येऊ शकते वेळ

Cholesterol in Leg Arteries: कोलेस्ट्रॉलमुळे केवळ हृदयाच्या नसांमध्येच नाही, तर पायांच्या रक्तवाहिन्यांमध्येही अडथळे निर्माण होऊ शकतात. पेरिफेरल आर्टरी डिसीजमुळे चालताना पाय दुखणे, गोळे येणे आणि रक्तपुरवठा कमी होण्याचा त्रास होतो. जाणून घ्या या आजाराची लक्षणं, कारणं आणि निदानाच्या चाचण्या.
High Cholesterol
High Cholesterolsaam tv
Published On: 

कोलेस्ट्रॉल म्हटलं की सर्वात आधी हृदयाच्या आरोग्याचा विचार केला जातो. कारण रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. पण कोलेस्ट्रॉल फक्त हृदयाच्या नसांमध्येच साचतं असं नाही. ते पायांच्या नसांमध्येही जमा होऊ शकतं. या समस्येला वैद्यकीय भाषेत 'पेरिफेरल आर्टरी डिसीज' असं म्हणतात.

वेळीच उपचार न केल्यास या आजाराची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे पायांच्या पेशींना नुकसान पोहोचू शकतं. एवढंच नाही तर गंभीर परिस्थितीत गँगरीन होऊन पाय कापण्याची वेळही येऊ शकते.

पायांच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल कसं साचतं?

पायांच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल कसं जमा होतं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याबाबत आजतकशी बोलताना मेदांता मूलचंद हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागातील प्राध्यापक डॉ. तरुण कुमार यांनी माहिती दिलीये.

High Cholesterol
High Cholesterol: त्वचेवर हे 5 बदल दिसले तर समजा हार्ट अटॅकचा धोका हळूहळू वाढतोय, कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं समजून घ्या

डॉ. तरुण कुमार यांच्या सांगण्यानुसार, आपल्या हृदयातून पायांपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी शरीरात अनेक रक्तवाहिन्या असतात. ज्यावेळी रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, तेव्हा ते या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर जमा होऊ लागतं. हळूहळू त्यामध्ये कॅल्शियम आणि सूज निर्माण करणाऱ्या पेशी जमा होतात. यामुळे एक थर तयार होतो. यालाच 'प्लाक' असं म्हणतात.

हा प्लाक वाढत गेल्याने रक्तवाहिन्यांमधील रक्त जाण्याचा मार्ग अरुंद होतो. परिणामी पायांपर्यंत पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही. कोलेस्ट्रॉलमुळे तयार झालेला हा प्लाक पायांच्या रक्तवाहिन्यांमध्येही जमा होऊ शकतो. याच स्थितीला पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) म्हणतात.

पेरिफेरल आर्टरी डिसीजची लक्षणं कोणती?

डॉ. तरुण कुमार सांगतात की, या आजाराचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे चालताना पाय दुखणं किंवा पायांच्या स्नायूंमध्ये गोळे येणं. तुम्ही कोणताही व्यायाम करत नसाल आणि शरीरातील व्हिटॅमिन डीचं प्रमाणही योग्य असेल, तरी पोटरी, मांड्या किंवा कंबरेच्या भागात दुखत असेल, तर हे या आजाराचं लक्षण असू शकतं. काही लोकांना पाय जड झाल्यासारखे वाटतात. तसंच पायांमध्ये अशक्तपणा किंवा कमजोरीही जाणवू शकते.

High Cholesterol
High Cholesterol: या 2 मसल्यांचं पाणी रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढेल बाहेर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

या लोकांना पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका जास्त

काही लोकांना या आजाराचा धोका इतरांपेक्षा अधिक असतो. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये पेरिफेरल आर्टरी डिसीज होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय धूम्रपान करणारे, उच्च रक्तदाबाचा त्रास असणारे आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. वाढतं वय आणि किडनीचा दीर्घकाळ असलेला आजार यामुळेही या समस्येचा धोका वाढू शकतो.

पेरिफेरल आर्टरी डिसीजचं निदान कसं केलं जातं?

हा आजार आहे की नाही, हे तपासण्यासाठी डॉक्टर एंकल ब्रॅकियल इंडेक्स (ABI) ही चाचणी करण्याचा सल्ला देऊ शकतात. या चाचणीमध्ये हाताचा आणि घोट्याजवळील रक्तदाब मोजून त्यांची तुलना केली जाते. याशिवाय गरज पडल्यास डॉप्लर अल्ट्रासाऊंड चाचणीही केली जाते. या तपासणीमुळे पायांमधील रक्तप्रवाह कसा आहे आणि रक्तवाहिन्यांमध्ये कुठे अडथळा निर्माण झाला आहे का, हे समजण्यास मदत होते.

High Cholesterol
High Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय? हे 5 पदार्थ खेचून बाहेर काढतील रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.