High Cholesterol: या 2 मसल्यांचं पाणी रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढेल बाहेर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Cholesterol Management: वाढलेलं कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हळद आणि काळी मिरीचे पाणी आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. हे पेय कसं तयार करायचं, त्यातील घटकांचे संभाव्य फायदे आणि सेवन करताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.
High Cholesterol
High Cholesterolsaam tv
Published On: 

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ शकते. यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. अशा वेळी औषधांसोबतच आहाराकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश करून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

नसांमध्ये चरबी जमा होण्याचा धोका

तेलकट पदार्थ खाणं आणि नियमित व्यायाम न करणं यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या वाढू शकते. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यास रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉलचा त्रास कमी करण्यासाठी सकाळी एका खास मसाल्याचं पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

High Cholesterol
High Cholesterol: शरीरात साचलेलं कोलेस्ट्रॉल झटक्यात निघेल बाहेर; फक्त दररोज सकाळी चावून खा हे 1 पाच रूपयांचं हिरवं पान

हळद आणि काळी मिरी

शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हळद आणि काळी मिरी यांचं पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

हळद आणि काळी मिरीचे फायदे

हळद आणि काळी मिरी या दोन्ही पदार्थांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी या पदार्थांचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो.

High Cholesterol
Juice For Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील 3 ज्यूस; रोज पिण्याची सवय लावाच

हळद आणि काळी मिरीचं पाणी कसं बनवायचं?

हे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद आणि काळी मिरी पावडर घाला. हे पाणी काही वेळ उकळू द्या. त्यानंतर पाणी गाळून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर त्याचं सेवन करा. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हळद आणि काळी मिरीचे पाणी तयार करू शकता.

High Cholesterol
High cholesterol: ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय? दोन्ही समस्यांवर तूप ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या पद्धत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.