Prolonged sitting: तासन्‌तास एकाच जागी बसून राहता? सावधान! कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचा संशोधनातून धक्कादायक खुलासा

Sedentary lifestyle: दिवसभर सलग बसून राहण्याचा कॅन्सरमुळे मृत्यूच्या वाढलेल्या धोक्याशी संबंध असल्याचं अभ्यासात आढळलं आहे. मध्येच उठून चालणं, हलकी शारीरिक हालचाल आणि नियमित व्यायाम केल्याने दीर्घकाळ निष्क्रिय राहण्याचा वेळ कमी करण्यास मदत होऊ शकते.
Prolonged sitting
Prolonged sittingsaam tv
Published On

दिवसभर कामाच्या निमित्ताने खुर्चीत बसून राहणं, टीव्ही पाहताना किंवा मोबाईल स्क्रोल करताना एकाच जागी तासन्‌तास बसून राहणं ही सवय आता अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली आहे. वीकेंडला कामाचा ताण नसल्यामुळे बराच वेळ सोफ्यावर किंवा बेडवर पडून राहतात. मात्र दीर्घकाळ कोणतीही हालचाल न करता बसून राहण्याची ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एका संशोधनातून सलग बसून राहणं आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका यांच्यात संबंध असल्याचं समोर आलंय.

ग्लासगो विद्यापीठातील संशोधक फ्रेडरिक हो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या अभ्यासात UK Biobank मधील 91,292 लोकांच्या आरोग्याच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये शारीरिक हालचालींची माहिती वेअरेबल अ‍ॅक्टिव्हिटी मॉनिटरच्या माध्यमातून घेण्यात आली. या लोकांचा सुमारे 12 वर्षे पाठपुरावा करण्यात आला. या अभ्यासाचा उद्देश दिवसभरातील बसण्याचा एकूण वेळ आणि सलग किती वेळ बसून राहिलं जातं याचा कॅन्सरच्या जोखमीशी असलेला संबंध तपासणे हा होता.

Prolonged sitting
High cholesterol: आहारात फक्त 'या' 3 पदार्थांचा करा समावेश; रक्तवाहिन्यांमध्ये जमा असलेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल

सलग बसण्याचा वेळ महत्त्वाचा

अभ्यासातील एक महत्त्वाची बाब म्हणजे फक्त दिवसभरात किती वेळ बसतो हे महत्त्वाचं नाही तर किती वेळ सलग बसून राहतो हेही आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरू शकते. 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ सलग निष्क्रिय राहण्याच्या सवयीचा कॅन्सरमुळे मृत्यूच्या वाढलेल्या धोक्याशी संबंध आढळला. अभ्यासानुसार, दररोज दीर्घकाळ सलग निष्क्रिय राहण्याच्या वेळेत प्रत्येक अतिरिक्त एक तास वाढल्यास कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका सुमारे 10 टक्क्यांनी अधिक असल्याचं आढळून आलं.

कोणत्या कॅन्सरशी संबंध?

दीर्घकाळ सलग बसून राहण्याचा संबंध केवळ कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूशीच नाही तर एकूण कॅन्सर होण्याच्या जोखमीशीही आढळला. विशेषतः लठ्ठपणाशी संबंधित काही कॅन्सरच्या बाबतीत हा संबंध दिसून आला. यामध्ये अन्ननलिका, लिव्हर, किडनी, पॅनक्रिया, मोठं आतडं, ब्रेस्ट, अंडाशय आणि थायरॉईड यांच्याशी संबंधित कॅन्सरचा समावेश आहे.

Prolonged sitting
High cholesterol: रात्रीचं जेवण बंद केल्याने रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांचं उत्तर ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

मध्येच उठून चालणं ठरू शकतं फायदेशीर

या अभ्यासातून समोर आलेली सकारात्मक बाब म्हणजे यासाठी नेहमी जिममध्ये जाऊन कठीण व्यायाम करण्याची गरज असेलच असं नाही. बराच वेळ बसून राहण्याऐवजी मध्येच उठून थोडी हालचाल करणंही फायदेशीर ठरू शकते.

संशोधकांनी दीर्घकाळ बसण्याच्या वेळेऐवजी हलकी शारीरिक हालचाल केल्यास काय परिणाम होऊ शकतो, याचाही अंदाज घेतला. दररोज एक तास दीर्घकाळ बसण्याच्या वेळेऐवजी हलकी शारीरिक हालचाल केल्यास कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका सुमारे 12 टक्क्यांनी कमी असल्याचे आढळलं. पायी हळू चालणं किंवा घरातील साधी कामं, जसं की भांडी घासणं किंवा इस्त्री करणं, यांसारख्या हालचालींचाही हलक्या शारीरिक हालचालींमध्ये समावेश होतो.

Prolonged sitting
High cholesterol: डाएटींग केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं नसांना चिकटलेली चरबी कशी कमी कराल, जाणून घ्या

त्याचप्रमाणे, दररोज 30 मिनिटांचा निष्क्रिय वेळ मध्यम स्वरूपाच्या शारीरिक हालचालीने बदलल्यास कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका सुमारे 8 टक्क्यांनी कमी असल्याचं आढळलं. तर पाच मिनिटांचा निष्क्रिय वेळ हेवी व्यायामाने बदलल्यास हा धोका सुमारे 22 टक्क्यांनी कमी असल्याचं अभ्यासात दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com