Pitru Paksha 2026: पितृ पक्ष सुरू होण्यापूर्वी घरात करा 'ही' 5 कामं; वास्तु मान्यतेनुसार वातावरण राहील प्रसन्न

Pitru Paksha 2026 date: पितृ पक्ष 2026 ला 26 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या काळापूर्वी घरातील तुटलेल्या व जुन्या वस्तू काढणे, दक्षिण-नैऋत्य दिशा स्वच्छ ठेवणे, पूर्वजांचे फोटो व्यवस्थित लावणे आणि शांत जागा तयार करण्याबाबत वास्तुच्या मान्यता जाणून घ्या.
Pitru Paksha 2026
Pitru Paksha 2026saam tv
Published On: 

हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा काळ महत्त्वाचा मानला जातो. यंदा म्हणजेच 2026 मध्ये पितृ पक्षाला 26 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी सर्वपितृ अमावस्येसोबत पितृ पक्षाची सांगता होईल. तर 26 सप्टेंबर रोजी पूर्णिमा श्राद्ध केले जाणार आहे.

पितृ पक्षाच्या काळात अनेक जण तर्पण, श्राद्ध आणि दानधर्म यांसारखी धार्मिक कामं केली जातात. मात्र पितृ पक्षाची तयारी केवळ पूजा किंवा धार्मिक विधींपुरती मर्यादित नसते. वास्तुच्या काही मान्यतांनुसार, पितृ पक्ष सुरू होण्यापूर्वी घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणेही महत्त्वाचे मानले जाते.

Pitru Paksha 2026
Pitru Paksha: श्राद्धाचे जेवण कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये? जाणून घ्या धार्मिक परंपरेतील नियम

घरात अनेक दिवसांपासून पडून असलेल्या जुन्या वस्तू, खराब सामान किंवा अस्ताव्यस्त असलेल्या जुन्या फोटोमुळे घराचा लूकही बिघडतो. त्यामुळे पितृ पक्ष सुरू होण्यापूर्वी घरातील काही गोष्टींकडे लक्ष देता येते. कोणती आहेत ही 5 कामं? जाणून घेऊया...

घरातील तुटलेल्या वस्तू काढून टाका

पितृ पक्ष सुरू होण्यापूर्वी घराची चांगली स्वच्छता करा. अनेक दिवस वापरात नसलेले कपडे, जुने कागद, रिकामे पॅकेट, तुटलेल्या वस्तू किंवा इतर निरुपयोगी सामान घरात साठवून ठेवू नका. वास्तुच्या मान्यतेनुसार, घरात गरजेपेक्षा जास्त सामान पडून राहिल्यास घरातील ऊर्जेचा प्रवाह प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे ज्या वस्तूंची आता गरज नाही, त्या घरातून काढून टाकणे चांगले मानले जाते.

दक्षिण आणि नैऋत्य दिशा स्वच्छ ठेवा

वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, दक्षिण आणि नैऋत्य दिशा पूर्वजांशी संबंधित मानल्या जातात. त्यामुळे पितृ पक्ष सुरू होण्यापूर्वी घरातील या दिशांकडे विशेष लक्ष द्या. या ठिकाणी जुने डबे, खराब वस्तू, तुटलेले फर्निचर किंवा बराच काळ न वापरलेले सामान पडले असेल, तर ते व्यवस्थित करा. या जागा स्वच्छ ठेवणे वास्तुच्या दृष्टीने चांगले मानले जाते.

पूर्वजांचे फोटो व्यवस्थित ठेवा

पितृ पक्ष हा पूर्वजांना आठवण्याचा काळ आहे. त्यामुळे घरात असलेले आजी-आजोबा किंवा इतर दिवंगत नातेवाईकांचे फोटो स्वच्छ करा. जुने फोटो खराब होत असतील तर ते डिजिटल स्वरूपातही जतन करून ठेवता येतील. घरातील पूर्वजांचे फोटो एका ठिकाणी व्यवस्थित ठेवण्याकडेही लक्ष देता येते.

Pitru Paksha 2026
Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

घरातील खराब वस्तू दुरुस्त करा

प्रत्येक घरात काही ना काही वस्तू बराच काळ खराब अवस्थेत पडून असतात. बंद पडलेले घड्याळ, तुटलेली खुर्ची, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा तुटलेली फोटो फ्रेम अशा वस्तू घरात असू शकतात. पितृ पक्ष सुरू होण्यापूर्वी अशा वस्तूंबाबत निर्णय घ्या. एखादी वस्तू उपयोगाची असेल तर तिची दुरुस्ती करून घ्या.

घरात शांत आणि स्वच्छ जागा तयार करा

पितृ पक्षाच्या काळात पूजा, प्रार्थना किंवा पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी घरात एक स्वच्छ आणि शांत जागा असणं चांगलं मानलं जातं. यासाठी घरात वेगळी मोठी जागा तयार करण्याची गरज नाही. घरातील एखादा स्वच्छ कोपरा यासाठी वापरता येतो. कुटुंबाच्या परंपरेनुसार या जागी प्रार्थना, तर्पण किंवा इतर धार्मिक विधी करता येतात.

Pitru Paksha 2026
श्रावणात दाढी आणि केस कापू नये असं का म्हणतात? जाणून घ्या 5 मुख्य कारणे

डिस्क्लेमर

या बातमीमध्ये हिंदू धार्मिक परंपरेत आढळणारी माहिती देण्यात आली आहे. यातील उल्लेख हे धार्मिक ग्रंथ व श्रद्धांवर आधारित असून, त्यांना वैज्ञानिक तथ्य किंवा सिद्ध झालेले सत्य म्हणून घेऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com