Manasvi Choudhary
हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पितृपक्षात पूर्वजांचे म्हणजेच पितरांसाठी महत्वाचा असतो.
पितृपक्षात पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे स्मरण करून त्यांचे विधिवत श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. ही परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे.
आजही प्रथा सुरू आहे. शास्त्रपद्धतीनुसार, पितरांचे कार्य केल्यास त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि घरातील पितृदोष नाहीसा होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे.
पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपतो. यावर्षी पितृपक्ष नेमका कधीपासून सुरू होणार आहे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पितृपक्षात १६ दिवसांमध्ये पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षासाठी विविध धार्मिक विधी करतात.
पूर्वजांच्या तिथीनुसार किंवा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध घालणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.