High cholesterol: दररोज करा फक्त ही 3 कामं; नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल कमी

Lower cholesterol naturally: वाढलेलं कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. औषधांसोबत आहार, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश, शारीरिक हालचाल वाढवणं आणि धूम्रपान टाळणं कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतं.
High cholesterol
High cholesterolsaam tv
Published On

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही. वाढलेलं कोलेस्ट्रॉल हृदयाशी संबंधित आजार आणि हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतं. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेकजण औषधं घेतात. मात्र औषधांसोबतच आपल्या रोजच्या सवयी आणि जीवनशैलीकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

जर तुम्हीही बऱ्याच दिवसांपासून कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आहार आणि दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करणं गरजेचं आहे. यासाठी रोजच्या आयुष्यात या ३ गोष्टी नक्की करा.

High cholesterol
Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

आहारात योग्य पदार्थांचा समावेश करा

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आहारात भरपूर फायबर असलेले पदार्थ समाविष्ट करा. ओट्स, बीन्स, सफरचंद आणि जव यांसारखे पदार्थ यासाठी चांगले पर्याय आहेत. फळांमध्ये सफरचंद, बेरीज आणि लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करू शकता, कारण त्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात मिळतं. याशिवाय ग्रीन टी, टोफू आणि सोयाचाही आहारात समावेश करता येतो.

High cholesterol
Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या एक आठवड्यापूर्वी शरीरात दिसतात हे 8 मोठे बदल, वेळीच धोका ओळखा

नियमित व्यायाम करा

फक्त आहारात बदल करून उपयोग होत नाही तर त्यासोबत नियमित व्यायाम करणंही गरजेचं आहे. तुम्हाला कोणता आजार असेल आणि त्यासोबत कोलेस्ट्रॉलची समस्याही असेल तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून ५ दिवस किमान ३० मिनिटं व्यायाम करू शकता. याशिवाय आठवड्यातून ३ दिवस किमान २० मिनिटं एरोबिक व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करण्याचाही पर्याय आहे.

वजन कमी करण्यावर लक्ष द्या

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणायचं असेल तर वजन नियंत्रणात ठेवणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे रोजच्या आहारातून जास्त कॅलरी मिळतील अशा पदार्थांचं सेवन कमी करा. गोड खाण्याची इच्छा झाली तर शरबत किंवा कमी अथवा फॅट नसलेल्या कँडीऐवजी जेली बीन्ससारखे पर्याय घेण्याचा प्रयत्न करू शकता.

High cholesterol
Heart attack prevention: हार्ट अटॅक येण्यापासून टाळायचाय? आजपासूनच बंद करा 'या' चुका; 14 गोष्टींवर ठेवा नियंत्रण

दिवसभराच्या कामात शक्य तितकी शारीरिक हालचाल वाढवा. जसं की, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा, काम करताना मध्येच थोडा ब्रेक घेऊन चालत जा आणि शक्य असल्यास काही वेळ उभं राहून काम करा. यासोबतच तुम्ही धूम्रपान करत असाल, तर ते शक्य तितक्या लवकर सोडणंही आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com