Heart attack prevention: हार्ट अटॅक येण्यापासून टाळायचाय? आजपासूनच बंद करा 'या' चुका; 14 गोष्टींवर ठेवा नियंत्रण

Heart attack risk factors: हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, रक्तदाब, मधुमेह, वजन, ताण, धूम्रपान, आहार आणि व्यायामासह 14 महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष देणे का गरजेचे आहे, जाणून घ्या.
Heart attack prevention
Heart attack preventionsaam tv
Published On

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढताना दिसतोय. चुकीचा आहार, वाढता ताण, व्यायामाचा अभाव आणि रोजच्या जीवनातील अनेक सवयी याचा थेट परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. SAAOL Heart Center चे डॉ. बिमल छाजर यांनी एका व्हिडिओमध्ये हृदयविकारामागे कारणीभूत ठरणाऱ्या १४ महत्त्वाच्या घटकांची माहिती दिलीये.

त्यांच्या मते, हार्ट अटॅक टाळायचा असेल किंवा हृदयाची स्थिती सुधारायची असेल तर केवळ एक-दोन गोष्टींकडे लक्ष देऊन उपयोग होत नाही. यामध्ये १४ असे घटक आहे ज्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे हार्ट अटॅक येऊ नये यासाठी या सर्व १४ घटकांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

या व्हिडीओमध्ये डॉ. बिमल छाजर सांगतात की, “हार्ट अटॅक रोखण्यासाठी किंवा त्याची स्थिती सुधारण्यासाठी केवळ एक-दोन घटकांवर काम करणं पुरेसे नाही. यामध्ये १४ असे घटक आहेत जे तुम्ही नियंत्रणात ठेवले तर तुम्हाला फायदा होतो.”

Heart attack prevention
Social media addiction: रोज 150 मिनिटांपेक्षा जास्त मोबाइलवर स्क्रोल करताय? सावधान! डिप्रेशनचा धोका वाढण्याची शक्यता

हृदयातील ब्लॉकेज कशामुळे होते?

डॉ. छाजर यांच्या मते, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स साचल्यामुळे ब्लॉकेज होण्याची शक्यता वाढते. हे दोन्ही घटक LDL म्हणजेच ‘वाईट कोलेस्ट्रॉल’शी संबंधित आहेत. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं ठरतं.

हार्ट अटॅकशी संबंधित चार आरोग्य समस्या

हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या वैद्यकीय कारणांमध्ये चार प्रमुख गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये उच्च रक्तदाब, रक्तातील साखर वाढणं म्हणजेच मधुमेह, लठ्ठपणा आणि HDL म्हणजेच ‘चांगलं कोलेस्ट्रॉल’ कमी असणं यांचा समावेश आहे. या समस्या दीर्घकाळ नियंत्रणाबाहेर राहिल्यास हृदयाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियमित तपासणी करून या गोष्टी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

रोजच्या सवयींचाही हृदयावर परिणाम

आपल्या जीवनशैलीतील काही सवयी हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. यामध्ये धूम्रपान, दारू किंवा तंबाखूचं सेवन, सततचा मानसिक ताण आणि व्यायाम किंवा शरीर-मनाला पुरेशी विश्रांती न मिळणं या चार घटकांचा समावेश आहे.

Heart attack prevention
High Cholesterol: हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यास चेहऱ्यावर दिसतात ही 5 लक्षणं, हार्ट अटॅक येण्यापूर्वी धोका ओळखा

आजच्या काळात कामाचा ताण, सततची धावपळ आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मात्र हृदय निरोगी ठेवण्यासाठी त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

आहारातील या चार गोष्टींकडेही लक्ष द्या

हृदयाच्या आरोग्यासाठी आपण काय खातो, यालाही मोठे महत्त्व आहे. डॉ. छाजर यांनी आहाराशी संबंधित चार घटकांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये जास्त तेलकट पदार्थ, नॉन-व्हेज म्हणजे मांसाहारी पदार्थ, फुल-फॅट डेअरी म्हणजे जास्त चरबीयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि नट्स व सीड्स म्हणजे काजू-बदामासारखे पदार्थ तसंच बियांचे जास्त सेवन यांचा समावेश आहे.

म्हणूनच आहारात या पदार्थांचं प्रमाण किती आहे, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. फक्त औषधांवर नाही संपूर्ण जीवनशैलीवर लक्ष देणं गरजेचं आहे.

डॉ. छाजर यांच्या मते, हार्ट अटॅक धोका कमी करण्यासाठी रक्तातील विविध घटक निरोगी पातळीवर ठेवणं महत्त्वाचं आहे. विशेषतः कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी सुरक्षित मर्यादेत ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावं.

हृदयाशी संबंधित काही त्रास किंवा लक्षणे जाणवत असतील, तर ती दुर्लक्षित न करता वेळेत वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार CT अँजिओग्राफीसारख्या तपासण्या आवश्यक असल्यास केल्या जाऊ शकतात. त्यासोबतच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जीवनशैलीत योग्य बदल केल्यास आजार पुढे वाढण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

Heart attack prevention
Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com