Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Early signs of heart failure: हार्ट फेल्युअरची सुरुवातीची लक्षणं कोणती? वारंवार श्वास लागणे, सतत थकवा, शरीरावर सूज येणे, हृदयाची धडधड वाढणे आणि भूक कमी होणे यांसारखी लक्षणं हृदयाच्या कार्यक्षमतेत बिघाडाचे संकेत असू शकतात. ही लक्षणं वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.
Heart failure symptoms
Heart failure symptomssaam tv
Published On

हार्ट फेल्युअर म्हणजेच हृदयाची कार्यक्षमता कमी होणं. या स्थितीत हृदय शरीराच्या गरजेनुसार पुरेसं रक्त पंप करू शकत नाही. त्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना आणि ऊतींना आवश्यक तेवढा ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत नाहीत. परिणामी शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

हार्ट फेल्युअरचे प्रामुख्याने दोन प्रकार मानले जातात. सिस्टोलिक हार्ट फेल्युअरमध्ये हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते. डायस्टोलिक हार्ट फेल्युअरमध्ये हृदयाचे स्नायू कडक होतात. त्यामुळे पुढे रक्त पंप करण्यासाठी हृदयात पुरेसं रक्त जमा होत नाही. हार्ट फेल्युअर ही गंभीर आरोग्यस्थिती आहे. मात्र त्याआधी शरीर काही संकेत देऊ शकते. हे संकेत वेळीच ओळखून त्याकडे दुर्लक्ष न करणं महत्त्वाचं आहे.

श्वास घेण्यास त्रास

श्वास लागणं किंवा धाप लागणं हे हार्ट फेल्युअरचे एक महत्त्वाचं आणि सामान्य लक्षण आहे. थोडं चालणं, जिना चढणं किंवा इतर साधी शारीरिक हालचाल केल्यानंतरही खूप धाप लागू शकते. काही वेळा कोणतीही शारीरिक मेहनत न करता आराम करत असतानाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे फुफ्फुसांमध्ये द्रव साचण्याची शक्यता असते. त्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते. वारंवार असा त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Heart failure symptoms
High cholesterol: आहारात फक्त 'या' 3 पदार्थांचा करा समावेश; रक्तवाहिन्यांमध्ये जमा असलेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल

सतत थकवा आणि अशक्तपणा

नेहमीची कामं करतानाही अचानक जास्त थकवा जाणवणं किंवा शरीरात अशक्तपणा वाटणं हे देखील हृदयाच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्याचे संकेत असू शकतात. हृदय शरीरात पुरेसं रक्त पंप करू शकत नसल्यामुळे स्नायू आणि शरीराच्या इतर ऊतींना आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी अगदी नेहमीची कामं केल्यानंतरही खूप थकल्यासारखं वाटू शकतं.

शरीरावर सूज येणं

शरीराच्या ऊतींमध्ये अतिरिक्त द्रव जमा झाल्यामुळे सूज येते. या स्थितीला एडेमा असं म्हणतात. हार्ट फेल्युअरमध्ये शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम झाल्याने अतिरिक्त द्रव साचू शकतो. यामुळे पाय, घोटे, हात, चेहरा किंवा पोटाच्या भागात सूज दिसू शकते. सुरुवातीला संध्याकाळच्या वेळी पाय किंवा घोटे सुजलेले दिसणं, चपला किंवा बूट घट्ट वाटणं अशी लक्षणं जाणवू शकतात.

Heart failure symptoms
High cholesterol: दररोजच्या आहारात या 3 भाज्यांचा करा समावेश; शरीराचं साचलेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल

हृदयाची धडधड वाढणं

हृदयाची धडधड नियमित असणं आवश्यक असतं. मात्र काही वेळा हृदय खूप वेगाने धडधडत असल्यासारखं वाटू शकतं किंवा ठोके अनियमित झाल्याची जाणीव होऊ शकते. हृदयाची धडधड अचानक वाढणं, हृदय जोरात धडधडत असल्याचं जाणवणं किंवा ठोके चुकल्यासारखं वाटणं याकडे दुर्लक्ष करू नये.

भूक कमी होणं

हार्ट फेल्युअरचा परिणाम केवळ श्वास किंवा रक्ताभिसरणावरच होत नाही तर पचनसंस्थेवरही होऊ शकतो. हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे पचनसंस्थेला होणारा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. यामुळे भूक कमी होणं, मळमळणं किंवा उलटीसारखे वाटणं अशी लक्षणे दिसू शकतात.

Heart failure symptoms
Bad cholesterol: दररोजच्या आहारात करा या 3 भाज्यांचा समावेश; नसांना चिकटलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल काढतील बाहेर

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com