Surabhi Jayashree Jagdish
यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील अनेक महत्त्वाची कामं यकृत करतं. त्यामुळे यकृत निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे.
यकृत शरीरात तयार होणारे काही घातक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. तसंच अन्न पचवण्यासाठी लागणारं पित्त तयार करण्याचं कामही यकृत करतं.
जास्त तेलकट आणि पॅकबंद पदार्थ खाणं, गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेणं आणि मद्यपान करणं या सवयींमुळे यकृतावर परिणाम होऊ शकतो. वजन वाढणं, मधुमेह आणि शरीरात इन्सुलिनचं काम नीट न होणं यामुळे यकृतात चरबी जमा होऊ शकते.
यकृताचे काही आजार सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणं दाखवत नाहीत. त्यामुळे काही त्रास होत नाही म्हणून यकृत पूर्णपणे निरोगी आहे असं समजू नये. जर रात्रीच्या वेळेस तुम्हाला काही लक्षणं दिसत असली तर समजा तुमचं लिव्हर खराब होतंय.
यकृताशी संबंधित काही समस्यांमध्ये पोटाच्या उजव्या वरच्या भागात दुखू शकतं. यकृताला सूज आली किंवा त्याचा आकार वाढला तर असा त्रास होऊ शकतो. रात्री वारंवार पोट दुखत असेल आणि त्याचं कारण समजत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
यकृताच्या काही आजारांमध्ये संपूर्ण शरीराला खाज येऊ शकते. यामध्ये शरीरातील पित्ताचा प्रवाह नीट होत नसेल तर अशी खाज येऊ शकते. रात्री शांत वातावरणात ही खाज जास्त जाणवू शकते आणि त्यामुळे झोपही खराब होऊ शकते.
यकृताच्या काही आजारांमध्ये मळमळ, उलटी, भूक कमी होणं किंवा खूप अशक्त वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात. काही वेळा चक्करही येऊ शकते. त्रास वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.