Liver Detox Tips: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी लवंगाचे पाणी ठरेल बेस्ट, तज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स

Clove Water: लिव्हर डिटॉक्स, पचन सुधारणा आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रात्री लवंगाचे पाणी सेवन फायदेशीर ठरू शकते, असे डॉक्टर सांगतात. सोपी पद्धत आणि महत्त्वाचे फायदे जाणून घ्या.
liver detox drink
natural detox remedysaam digital
Published On
Summary

लवंगाचे पाणी लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास मदत करतं.

झोपण्यापूर्वी सेवन केल्यास पचन सुधारतं आणि पोटफुगी कमी होते.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त.

सध्याच्या बदलत्या जीवनमुशैलीमुळे अनेकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये औषधांसोबत काही स्वयंपाक घरातले पदार्थ सुद्धा तुम्हाला गंभीर आजारापासून लांब ठेवू शकतात. फ्लोरिडातील एक अनुभवी प्लास्टिक सर्जन डॉ. अल्बेरिको सेसा यांनी रात्री झोपी जाण्यापूर्वी लवंगाचे पाणी पिण्याचे फायदे पुढे सांगितले आहेत.

लवंग ही सुगंधी, गोडसर आणि थोडी मसालेदार चवीची आणि विविध आरोग्य फायदे देणारी महत्त्वाची सामग्री आहे. लवंग गरम मसाल्यांमध्ये वापरली जाते. लवंगमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. लवंग पारंपारिक औषधांमध्येही लवंग वापरली जाते. Healthline.com नुसार, काही संशोधनात लवंग लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाते. मात्र लवंगाचे पाणी विशेषतः रात्री प्यायल्याने त्याचे आरोग्यावर जास्त सकारात्मक परिणाम होतो, असे डॉ. सेसा यांनी सांगितले.

liver detox drink
White Tongue: जीभ पांढरी दिसतेय? दुर्लक्ष करू नका; वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

डॉ. सेसा यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले की, लवंगाच्या पाण्यात खूप आवश्यक अँटिमायक्रोबियल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. झोपण्यापूर्वी हे पाणी प्यायल्यास पचनसंस्थेला मदत होते, पोटफुगी कमी होते आणि हानिकारक बॅक्टेरिया किंवा परजीवींपासूनही संरक्षण मिळतं. त्यांच्या मते, हे पेय रात्री रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यास आणि झोपेत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतं. तसेच, या पाण्याचा नैसर्गिक उबदारपणा शरीराला आराम देऊन जास्त चांगली विश्रांती मिळविण्यात मदत करतं.

लवंगाचे पाणी बनवण्याची पद्धतही त्यांनी समजावून सांगितली. सर्वप्रथम काही लवंगा गरम पाण्यात टाकून १० ते १५ मिनिटे भिजत घाला. मग ते पाणी गाळून पिण्यास तयार होते. झोपण्यापूर्वी ही सवय फॉलो करा आणि लिव्हर डिटॉक्स करा.

टीप: हा अहवाल सोशल मीडियावर आधारित युजर-जनरेटेड कंटेंटवर आधारित आहे. या बाबतीत साम टिव्ही कोणतीही शिफारस करत नाही.

liver detox drink
Chanakya Niti: या ५ ठिकाणी थांबलात तर आयुष्य थांबेल; चाणक्यांनी सांगितलेले मार्ग डोक्यात फिट्ट करून घ्या!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com