Sakshi Sunil Jadhav
अनेकांना सकाळी उठल्यावर जीभेवर पांढरे थर दिसतात. हे बहुतेक वेळा साध्या कारणांमुळे होऊ शकते, मात्र काही वेळा हे गंभीर आरोग्य समस्या किंवा आजारांचे संकेत देखील असू शकतात.
पाणी कमी पिणे किंवा तोंड कोरडे राहणे डिहायड्रेशन यामुळे जीभेवर पांढरा थर बसू शकतो.
तोंड व्यवस्थित न साफ केल्यास जंतू आणि मृत पेशी जीभेवर साचून पांढरा लेयर तयार होतो.
कँडिडा नावाच्या फंगल इन्फेक्शनमुळे जीभेवर दाट पांढरे थर दिसू शकतात. हे विशेषतः प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांत दिसते.
पचन बिघडल्यास, गॅस, जळजळ किंवा आम्लपित्त वाढल्यास जीभेवर पांढरे डाग तयार होतात.
तोंडातील ल्यूकोप्लाकिया ही स्थिती तंबाखू, गुटखा किंवा धूम्रपान करणाऱ्यांत दिसून पांढऱ्या जाड पुट्या तयार करते. हे लक्षण दुर्लक्षित करणे धोकादायक आहे.
व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गांमध्ये जीभ पांढरी दिसू शकते. शरीराच्या प्रतिकार प्रक्रियेचा हा संकेत असू शकतो.
व्हिटॅमिन B12, फोलिक अॅसिड किंवा आयर्नची कमी असल्यास जीभेचा रंग बदलतो आणि पांढरा थर दिसतो.
तोंड जळणे, चावा लागणे किंवा ऍलर्जीमुळे झालेल्या सूजेमुळे जीभेवर पांढरे भाग निर्माण होतात.