Sakshi Sunil Jadhav
नाशिकपासून अगदी जवळ असलेले सापुतारा हिल स्टेशन हिवाळ्यात विशेष आकर्षक बनते. धुक्याचं वातावरण, निसर्गरम्य दऱ्या, शांत तलाव आणि साहसप्रेमींसाठी उत्तम अॅक्टिव्हिटीज यामुळे हा सीझन पर्यटकांनी फुलून जातो.
हिवाळ्यात सकाळी संपूर्ण दरी धुक्यात झाकलेली दिसते. येथून दिसणारा सूर्योदय अप्रतिम आहे.
हिवाळ्यात हलक्या गारव्यात लेक बोटींगचा अनुभव अत्यंत रोमँटिक आणि रिलॅक्सिंग वाटतो.
गेल्या काही वर्षांत सनसेट पॉइंट हे पर्यटकांचं हॉटस्पॉट ठरत आहे. ढगांच्या वर दिसणारा सूर्यास्त पाहण्यासाठी अनेकांची येथे गर्दी पाहायला मिळते.
सापुताऱ्यापासून जवळ असलेला हा किल्ला एक हिडन ट्रेक स्पॉट आहे. कमी गर्दी आणि हटके दृश्ये मिळतात.
गिरीमार्ट धबधबाजवळ हिवाळ्यातही थोडा प्रवाह असतो. फोटोसाठी परफेक्ट आणि मुलांसाठी सुरक्षित पिकनिक स्पॉट आहे.
आदिवासी संस्कृती, कला आणि हस्तकलेची प्रदर्शने हिवाळ्यात इंडोअर अॅक्टिव्हिटीसाठी हे सगळ्यात बेस्ट स्पॉट आहे.
गव्हर्नर हिल व्ह्यू पॉइंट हे ठिकाण तुलनेने कमी गर्दीतलं, पण पर्वतरांगांचे व्यू इथे पाहायला मिळतात.
परिसर शांत असल्याने मजेदार अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. आसपास हिरवाई आणि लहान ट्रेकचे मार्ग. छोट्या मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, हिरवंगार लॉन आणि कुटुंबांसाठी हे उत्तम पिकनिक लोकेशन आहे.