Clove Health Benefits: दुपारच्या जेवणानंतर लवंग खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे जाणून घ्या

Health Benefits: जेवणानंतर काही तरी गोड किंवा माउथ फ्रेशनर म्हणून सगळे काहीना काही खात असतात. त्यात जर तुम्ही लवंग सेवन केलतं तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. तसेच तुम्हाला पोटाच्या, डायबिटीजच्या समस्यांपासून सुद्धा सुटका मिळू शकते.
Health Care Tips
CloveSAAM TV
Published On

भारतात जेवणानंतर माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप, वेलची किंवा काही गोड पदार्थ खाल्ले जातात. यामध्येच तुम्ही लवंग खायला सुरुवात केली तर तुम्हाला आश्चर्यचकीत करून टाकणारे फायदे जाणवायला लागतील. यामध्ये विविध आयुर्वेदीक फायदे आहेत. लवंग खाल्याने फक्त तोंडाचा दुर्गंधच कमी होत नाही तर तुमची पचनक्रिया मजबूत होते, दातांच्या समस्या दूर होतात आणि शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

तज्ज्ञांचे लवंग खाण्यावर मत काय?

तुम्ही जेवणानंतर लवंग खात असाल तर तुमच्या शरीराला आवश्यक असणारे अ‍ॅंटी-बॅक्टेरियल, अ‍ॅंटी-फंगल आणि अ‍ॅंटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म मिळू शकतात. त्याने तुमच्या अ‍ॅसिडीटीच्या समस्या कमी होऊ शकतात. लवंगामध्ये असणारे गुणधर्म तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतात. मात्र अती प्रमाणात लवंगाचे सेवन केलेत तर पोटाला नुकसान सुद्धा होऊ शकतं.

Health Care Tips
Summer Health Tips: वातावरण बदललं, मुलांची तब्येत सांभाळा ! आजारपण टाळण्यासाठी द्या 'हा' विशेष आहार

तोंडातील दुर्गंध नष्ट होणे

प्रत्येकाला माहितचं असेल जेवणानंतर तोंडाला दुर्गध येतो. त्यासाठी विविध माउथ फ्रेशनरचा वापर केला जातो. पण आयुर्वेदामध्ये लवंगाचा वापर तोडांची दुर्गंधी घालवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून लांब सुद्धा राहता येत. जसे की, गळ्यात खवखव होणे, सर्दी-खोकला, कफ यांसारख्या आजारांवर घरगुती उपाय म्हणून तुम्ही लवंगाचे सेवन करू शकता.

लवंगाचे सेवन केल्याने होणारे फायदे

लवंगाचे सेवन केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते.

डायबिटीजच्या रुग्णांनसाठी लवंगाचे सेवन करणे खूप फायदेशीर असते.

लवंगाचे सेवन केल्याने तुमचा इन्सुलीन स्पीड वाढतो.

तसेत लवंगाचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

तज्ज्ञांच्या मते लवंग खातानाच्या टिप्स

तुम्ही जेवनानंतर १ किंवा २ लवंग खाणं फायदेशीर राहील. लवंग खाताने ते एका कॅंडीप्रमाणे खावे.

लवंग खाण्याची सर्वोत्तम वेळ

लवंग अनेक उपचारांवर प्रभावशाली आहे. आयुर्वेदामध्ये लवंगाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. पण लवंग जास्त प्रमाणात खाणं हे जास्त फायदेशीर ठरू शकतं. तर लवंग खाताना तुम्ही योग्य वेळ पाळलीत तर त्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त होण्याची शक्यता असते. तुम्ही दुपारच्या झोपेच्यावेळेस किंवा रात्रीच्या झोपेच्या वेळेस लवंग सेवन करू शकता. त्याने तुमच्या यकृताचे कार्य सुरळीत चालते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care Tips
Bhagwad Geeta Life Lessons: चांगल्या व्यक्तींसोबत नेहमीच वाईट का घडतं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com