Acidity During Pregnancy : प्रेग्नेंसीच्या काळात अ‍ॅसिडीटीच्या समस्येला सामोरे जावे लागतेय ? अशाप्रकारे घ्या काळजी

Acidity Symptoms In Pregnancy : गर्भधारणेदरम्‍यान अ‍ॅसिड रिफ्लेक्‍स अत्‍यंत सामान्‍य आहे. बहुतांश वेळा त्‍याची लक्षणे सौम्‍य असतात.
Acidity During Pregnancy
Acidity During PregnancySaam Tv

Indigestion And Heartburn In Pregnancy : प्रसूती हा महिलांच्‍या जीवनातील सर्वात आनंददायी काळ असतो. आनंददायी असला तरी या ९ महिन्‍यांच्‍या प्रसूतीकाळादरम्यान काही विशिष्‍ट आव्‍हाने देखील येऊ शकतात. बहुतांश गरोदर महिला त्‍यांच्‍या गर्भातील बाळाला आरोग्‍यदायी ठेवण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करण्‍याला प्राधान्‍य देतात, पण त्‍यांनी स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे.

मुंबईतील शिवानी मदर अॅण्‍ड चाइल्‍ड केअर हॉस्पिटलमधील कन्‍सल्टिंग ऑब्स्टेट्रिशियन, ग्‍यानेकोलॉजिस्‍ट व एण्‍डोस्‍कोपिस्‍ट डॉ. संगीता शेट्टी म्‍हणतात, गर्भधारणेदरम्‍यान अॅसिड रिफ्लेक्‍स अत्‍यंत सामान्‍य आहे. बहुतांश वेळा त्‍याची लक्षणे (Symptoms) सौम्‍य असतात आणि त्‍यांचे व्‍यवस्‍थापन करता येते. पण, यामुळे अस्‍वस्‍थता जाणवू शकत असल्‍यामुळे गर्भवती माता व त्‍यांच्‍या केअरगिव्‍हर्सना ते करू शकणारे उपाय आणि या लक्षणांपासून आराम मिळण्‍यासाठी उपलब्‍ध सोल्‍यूशन्‍सबाबत माहित असणे आवश्‍यक आहे.

Acidity During Pregnancy
Belly Itching During Pregnancy : गरोदरपणात पोटाला व हाता-पायाला खाज येते ? दुर्लक्ष करु नका, असू शकतो गंभीर आजार

जीवनशैली व आहारविषयक (Food) बदल, तसेच सुरक्षित व गुणकारी अॅण्‍टासिड पर्याय अत्यावश्यक आराम देण्‍यामध्‍ये मदत करू शकतात. या समस्‍या दीर्घकाळापर्यंत राहिल्‍या किंवा त्‍यांचे व्‍यवस्‍थापन करणे अवघड जात असेल तर डॉक्‍टरांचा त्‍वरित सल्‍ला घ्‍या.

अॅबॉट येथील मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. जेजो करणकुमार म्‍हणाले, प्रत्‍येक महिलेचा प्रसूती काळ वेगळा असतो. अॅबॉटमध्‍ये आम्‍ही जागरूकतेचा प्रसार करण्याप्रती आणि गर्भवती महिलांना प्रसूती काळादरम्‍यान आरोग्‍यदायी राहण्‍यास सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.

Acidity During Pregnancy
Women Desire : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

आरोग्‍यदायी जीवनशैली सवयींचे पालन करत आणि अॅसिडीटीच्‍या लक्षणांपासून आराम मिळण्‍यामध्‍ये साह्य करू शकणा-या उपलब्‍ध सोल्‍यूशन्‍सचा वापर करत सामान्‍य अॅसिड रिफ्लक्‍स समस्‍यांसारखी कोणतीही अस्‍वस्‍थता कमी करणे महत्त्वाचे आहे.

प्रसूतीकाळादरम्‍यान (Pregnancy) स्त्रीच्‍या शरीरात विविध बदल होतात, जसे पायांच्‍या घोट्यांना सूज येणे, सकाळी अस्‍वस्‍थ वाटणे, मळमळणे. जगामध्‍ये जवळपास ७० टक्‍के गर्भवती महिलांना याचा अनुभव येतो. प्रसूतीकाळादरम्‍यान आणखी एक सामान्‍य तक्रार म्‍हणजे अॅसिड रिफ्लक्‍स किंवा छातीत जळजळ. यामध्‍ये छातीत जळजळ होते किंवा तुम्‍हाला पोट भरल्‍यासारखे, अधिक खाल्‍यासारखे किंवा पोट फुगले आहे असे वाटू शकते. हे ३० ते ५० टक्‍के गर्भधारणेमध्‍ये दिसून येते आणि तिसरा महिना सुरू असलेल्‍या ८० टक्‍के महिलांमध्‍ये हे सर्वाधिक दिसून येते.

Acidity During Pregnancy
Pregnancy Cough Home Remedies : गरोदरपणात खोकल्यामुळे त्रस्त आहात ? तर 'या' घरगुती उपायांचा वापर करुन पाहा

तुम्‍हाला प्रसूतीकाळादरम्‍यान अॅसिडीटीचा त्रास का होतो याबाबत प्रश्‍न पडला असेल तर, तज्ञांच्‍या मते, यासाठी काही संभाव्‍य घटक कारणीभूत आहेत, जसे प्रसूती काळादरम्यान शरीरातील हार्मोनल बदलतात. गर्भधारणेच्‍या नंतरच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये बाळाचा गर्भामधील वाढता दबाव देखील कारणीभूत घटक असू शकतो. जर तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक खात असाल तर हा त्रास नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे अपचन देखील होऊ शकते.

छातीत जळजळ होण्‍यापासून आराम मिळण्‍याकरिता काही सोपे उपाय :

1.कारणीभूत घटक टाळा:

अॅसिडीटीला कारणीभूत ठरणारे खाद्यपदार्थांचे सेवन टाळा. यामध्‍ये सामान्‍यत: फॅटी, तळलेले व मसालेदार पदार्थ, चॉकलेट, मिंट आणि उच्‍च अॅसिडीक प्रमाण असलेले फूड्स (जसे संत्री, ग्रेपफ्रूट्स, लिंबू व द्राक्षे) यांचा समावेश असतो. तसेच कॅफीनेटेड व कार्बोनेटेड पेये (जसे कॉफी व सोडा) यासारखे कारणीभूत घटक टाळा. तसेच गरोदर असताना धूम्रपान व मद्यपान करणे टाळा, कारण यामुळे अपचन होण्‍यासोबत त्याचा तुमच्‍या आणि जन्‍माला न आलेल्‍या बाळाच्‍या आरोग्‍यावर परिणाम होऊ शकतो.

Acidity During Pregnancy
Namrata Pradhan : मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच !

2. आरोग्‍यदायी पदार्थांचे सेवन :

आरोग्‍यदायी, संतुलित आहाराचे सेवन करा आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सेवन केल्यानंतर कसे वाटते याकडे लक्ष द्या. ज्‍यामुळे कळेल की, कोणत्या पदार्थांमुळे त्रास होतो ते. थोड्या प्रमाणात आहाराचे सेवन करण्‍याचा प्रयत्‍न करा, कारण अधिक प्रमाणात आहाराचे सेवन केल्‍यास छातीत जळजळ होऊन लक्षणे अधिक दिसू शकतात. तसेच जेवताना सरळ बसा, ज्‍यामुळे पोटावर अतिरिक्‍त दबाव येणार नाही.

3. झोपण्‍याच्‍या सवयींमध्‍ये बदल करा:

जेवण व झोप यामध्‍ये किमान तीन तासांचे अंतर ठेवा. तसेच रात्री उशिरा जेवण सेवन करू नका आणि तंग कपडे परिधान करणे टाळा. डाव्‍या कुशीवर झोपणे, पलंग काहीसा उंच करणे यामुळे देखील अॅसिडीटीच्‍या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होऊ शकते. तसेच झोपेमध्‍ये अनियमितपणा किंवा अपुरी झोप यामुळे अॅसिडीटीमध्‍ये वाढ होऊ शकते, म्‍हणून दररोज किमान सहा ते सात तास झोप घेण्‍याचा प्रयत्‍न करा.

Acidity During Pregnancy
Prarthana Behere : कपाळी चंद्रकोर, केसात गजरा, प्रार्थानाच्या साडीवर साऱ्यांच्या नजरा...

4. आरामाचे स्रोत:

छातीत जळजळपासून आराम मिळवण्‍यास मदत करणारे सोल्‍यूशन्‍स आहेत. जीवनशैलीमध्‍ये बदल केल्‍याने लक्षणांवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर अॅण्‍टासिड औषधोपचार अॅसिडीटीसाठी उपचार पर्याय आहेत. अॅसिडीटीची कोणतीही लक्षणे जाणवल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घेणे नेहमी सर्वोत्तम आहे. हे उपाय तुम्‍हाला तुमच्‍या प्रसूतीकाळादरम्‍यान अॅसिडीटीवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत करू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com