ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
लवंग खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि शरीराचे अनेक संसंर्गापासून संरक्षण होते.
लवंगमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स पेशींना नष्ट होण्यापासून वाचवतात. तसेच रिकामी पोटी लवंग खाल्लाने पचनक्रिया सुरळीत राहते.
लवंगामध्ये अँटी-इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.
लवंगामध्ये असलेले फ्लॅव्होनॅाइड्स मँगनीज आणि युजेनॅाल हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
दातदुखीसाठी लवंग तेल फायदेशीर आहे. दातदुखीची समस्या असल्यास दातात लवंग ठेवा किंवा लवंगाचे तेल वापरा.
लवंग खाल्ल्याने सर्दी आणि खोकला बरा होतो. तसेच घशातील खवखवण्याची समस्याही दूर होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.