ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेहाच्या रुग्णांना साखर नियंत्रित करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात.यासह खाण्यापिण्याच्या सवयी देखील योग्य असायला हव्यात अन्यथा ब्लड शुगर वाढते.
कारल्याची चव कडू असते. पण कारल्यामध्ये फायबर, प्रथिने, फॅट्स आणि मिनरल्स सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे कारल्याचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारल्याचा ज्यूस कसा फायदेशीर ठरु शकतो. जाणून घ्या.
कारल्याच्या रसमध्ये असलेले पॅालीपेप्टाइड पी इन्सुलिनचे नियमन करते.
डायबिटीच्या रुग्णांना दुखापत झाली तर ते लवकर बरे होत नाहीत. कारल्याचा ज्यूस प्यायल्याने दुखापत लवकर बरी होण्यास मदत होते.
कारल्याच्या ज्यूसचे सेवन केल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयासी संबधित आजारांचा धोका कमी होतो.
डायबिटीज रुग्णांचे वजन सहज वाढते. त्यामुळे कारल्याच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने वजन वाढत नाही. आणि नियंत्रणात राहते.
डायबिटीजचे रुग्णांनी कारल्याचे ज्यूस पिण्याआधी डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण जास्त प्रमाणात ज्यूस प्यायल्याने काही गंभीर परिणामही होऊ शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.