ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डाळ-भात, पराठा किंवा चपाती यांच्यासोबत लोणचं खाण्याची मजा येते. जर तुम्हालाही घरीच झटपट पद्धतीने लोणचं बनवायच असले तर ही रेसिपी नक्की नोट करा.
५०० ग्रॅम लिंबू, १ चमचा हिंग, २५ ग्रॅम लाल तिखट, २० ग्रॅम मेथी पूड, अर्ध चमचा हळद, मोहरीचे तेल, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम लिंबू धुवून सुकवून घ्या.सर्व लिंबू २ किंवा ४ भागांमध्ये कापून घ्या.
एका कढईत मोहरीचे तेल घाला. सर्व लिंबू १० ते १२ मिनिटांसाठी मंद आचेवर चांगले परतवून घ्या.
यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालून १० मिनिटे परतून घ्या. यानंतर मेथीचे दाण्याची पावडर, हिंग , काळीमिरी पावडर आणि हळद पावडर घाला आणि चांगले शिजवा.
सर्व मसाले मिक्स केल्यानंतर मिश्रण चांगले परतून घ्या. आणि १० मिनिटांसाठी चांगले शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करा. थंड झाल्यावर हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये ठेवा
चटपटीत लिंबाचे लोणचं तयार आहे. पराठा, चपाती किंवा गरमागरम डाळ भात सोबत याचा आस्वाद घ्या.